Headlines

गोवंश पालकांना मिळणार प्रति महिना 900 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

[ad_1]

लखनऊ :Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यूपीमध्ये भाजपसमोर सत्ता वाचवण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. गेल्या तीन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहता या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार, याबाबत तूर्तास काही सांगणे कठीण आहे.

‘आधी मतदान, मग अल्पोपाहार’

जनतेला आवाहन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत की, सर्व कामे सोडून आधी मतदानाला जा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘यू.पीमध्ये आज विधानसभा निवडणूक-2022 चा चौथा टप्पा आहे.भयमुक्त, दंगलमुक्त, गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी, सर्व आदरणीय मतदारांनी त्यांच्या स्वप्नातील उत्तर प्रदेश हे विकसित आणि सुरक्षित राज्य बनवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा… आधी मत द्या मग नाश्ता करा. चौथ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान होणार आहे.

गायीच्या नावावर मत 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लोकांना गायींचे रक्षण करणार्‍यांना मत देण्यास सांगितले, गाईची कत्तल करणाऱ्यांना मत देऊ नका. 2017 पूर्वी राज्यात गुंडांचे राज्य होते, मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असेही ते म्हणाले.
 
गोपालकांना दरमहा 900 रुपये

अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर राखीव विधानसभा मतदारसंघ आणि बिकापूर मतदारसंघातून उभे असलेल्या भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आदित्यनाथ प्रचार करत होते. पुन्हा सत्तेत आल्यास गायी आणि इतर गोवंशांची संख्या वाढवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

गायींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति गाय प्रति महिना 900 रुपये दिले जातील अशी घोषणा त्यांनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *