Headlines

गुड न्यूज! फक्त 580 रुपयात करा 1000 किमी पर्यंत प्रवास; जाणून घ्या या इलेक्ट्रिक SUV चे फीचर्स

[ad_1]

मुंबई : सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा खर्च वाढला आहे. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा सध्या वापर कमी आहे. इलेक्ट्रिक वाहने थोडी महाग असली तरी. पण त्याचा सौदा खूप फायदेशीर आहे. अशाच एका इलेक्ट्रिक कारबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कार तुम्हाला 520 रुपयांमध्ये 1000 किमी धावू शकते.

कार 9.9 सेकंदात 100 किमी/ताशीचा वेग

आम्ही Tata Nexon EV बद्दल बोलत आहोत. लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसह, टाटा अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या कारची किंमत 14,24,000 रुपयांपासून सुरू होते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. कार पर्मनंट मॅग्नेट एसी मोटरवर चालते, जी 245 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

पूर्ण चार्जिंगवर इतक्या किमीपर्यंत प्रवास

Tata Nexon EV एका चार्जवर किमान 300 किमी धावू शकते. Nexon बॅटरी 15 amp प्लगने घरी देखील चार्ज केली जाऊ शकते. कंपनीने 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी दिली आहे. एका तासापेक्षा कमी कालावधीत ही कार 80 टक्के चार्ज होईल. 

तर, साधारण चार्जरवर चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तास लागतील. याशिवाय Tata Nexon EV मध्ये सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट, EBD सह ABS सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

580 रुपयांमध्ये 1000 किमी धावेल

SUV मध्ये 30.2 kwh ची बॅटरी आहे. ती पूर्ण चार्ज करण्यासाठी 30.2 युनिट वीज लागते. म्हणजेच 6 रुपये/युनिट वीज दर विचारात घेतल्यास, एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी 181.2 रुपये खर्च येतो. म्हणजेच कार 1000 किमी चालवण्यासाठी 580 रुपये वीज खर्च होईल असे म्हणता येईल.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *