“मेरा काम हो गया, गुडबाय…” 2 महिन्यांत 12 शो रद्द झाल्यानंतर, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाले

बेंगळुरू: उजव्या विचारसरणीच्या गटांच्या धमक्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत किमान 12 शो रद्द झाल्यानंतर कॉमेडियन मुनावर फारुकी यांनी काल सांगीतले की तो आणखी शो करू शकत नाही.

रविवारी बेंगळुरूमधील त्यांचा एक नियोजित शो बेंगळुरू पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्याचे कारण देत पोलिसांनी शोच्या आयोजकांना शो रद्द करण्यास सांगितले होते. यानंतर त्यांचे निराशाजनक वक्तव्य समोर आले आहे.

इतकेच नाही तर पोलिसांनी आयोजकांना लिहिलेल्या पत्रात फारुकी यांना ‘विवादित व्यक्ती’ म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फारुकीला मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात हिंदू देवतांवर कथित टिप्पणी केल्याबद्दल सुमारे एक महिन्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आज दुपारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुनव्वर फारुकी म्हणाले, “द्वेष जिंकला, कलाकार हरला. माझे काम झाले, अलविदा.. अन्याय.”

Leave a Reply