Headlines

घरात AC असूनही थंड हवा मिळत नाही, गारवा जाणवत नाही, फॉलो करा या ४ टिप्स

[ad_1]

नवी दिल्लीः AC Tips: सध्या उन्हाची चटकी बसू लागली आहेत. त्यामुळे अनेक लोकांनी घरात एसी बसवला आहे. परंतु, अनेकांच्या घरात एसी असूनही मनासारखी थंड हवा मिळत नसेल तर काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत. घरात विंडो एसी किंवा स्प्लिट एसीचा वापर करीत असाल तसेच तुम्हाला तुमच्या मनासारखी थंड हवा मिळत नसेल तर या ठिकाणी चार टिप्स दिल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्हाला थंडा थंडा कूल कूल हवा मिळू शकते. तुमचा एसी कसा आहे, तसेच किती थंड हवा देतो, यासाठी काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स. खालील टिप्स फॉलो करा.

कूलिंग मोड
तुम्हाला हे ध्यानात ठेवायला हवे की, तुमचा एसी कोणत्या मोडवर सुरू आहे. हा कूल, ड्राय, हॉट, फॅन सह अनेक मोडवर सुरू असू शकतो. तुम्हाला चांगली कूलिंग हवी असेल तर तुमचा एसी कूल मोडवर असायला हवा. तरच तुम्हाला थंड हवा मिळू शकते.

स्वच्छता
घरात प्रत्येक इलेक्ट्रिक डिव्हाइसची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही वेळोवेळी एसी सर्विस करीत नसाल तर ती करायला हवी. खास करून एसीचे फिल्टर्स लवकरच खराब होतात. जर तुम्ही वेळोवेळी त्या एसीला स्वच्छ करीत नसाल तर तुम्हाला कूलिंग चांगली मिळणार नाही.

खिडकी-दरवाजे बंद करा
जर घरात जास्त कूलिंग हवी असेल तर घरातील दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करण्यात आल्यात की नाही हे एकदा चेक करा. जर थोडी जरी हवा जात असेल तर तुमची खोली थंड होणार नाही. त्यामुळे जबरदस्त कूलिंगसाठी तुमच्या खोलीत एसीची हवा जास्त राहण्यासाठी खिडकी व दरवाजे पॅक असायला हवेत.

खोलीची साइज
जर तुम्ही १ टन एसीचा वापर करीत असाल तर तुमच्या खोलीची साइज १०० स्केअर फूट असायला हवी. तरच तुमची खोली थंड होऊ शकेल. जर तुमची खोली १५० स्केअर फूल असेल तर तुम्हाला १.५ टन एसीची गरज लागेल. जर तुमची खोली २०० स्केअर फूट असेल तर तुम्हाला २ टनच्या क्षमतेची एसी लागेल. खोलीत जितके लोक जास्त असतील तितकी एसी कमी लागेल.

वाचाः ‘या’ एकमेव कारणामुळे लवकर खराब होतात स्मार्टफोनचे ओरिजनल चार्जर

वाचाः WhatsApp चे सर्वात मोठे अपडेट, एकाचवेळी ३२ लोक करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग

वाचाः WhatsApp Scam: व्हॉट्सअॅपवर आलेल्या ‘या’ मेसेजला चुकूनही रिप्लाय करू नका

वाचाः उन्हाळी सुट्टीत गावाला जायचंय?, असं बुक करा रेल्वेचं कन्फर्म तिकिट, एजंटला पैसे द्यायची गरजच नाही

वाचा: अवघ्या १९ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, मिळेल हाय-स्पीड डेटाचा फायदा; पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *