Headlines

घर बसल्या दुरुस्त करा PAN Card मधील नावातील चूक, ५ मिनिटांत होईल काम, प्रोसेस खूप सोपी

[ad_1]

नवी दिल्ली: PAN Card : सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या यादीत PAN Card चा समावेश होतो. म्हणजेच आता पॅन कार्डशिवाय अनेक महत्त्वाची कामे करणे कठीण झाले आहे. अशात तुम्हाला पॅन कार्ड अपडेटेड ठेवणे देखील आवश्यक आहे. पण, अनेक वेळा पॅनकार्डमधील नाव चुकलेले असते. अशात ते दुरुस्त करून घेणे खुप महत्वाचे आहे. यासाठी सोप्पी प्रोसेस फॉलो करावी लागेल. पॅन कार्ड दुरुस्तीसाठी तुम्हाला अधिकृत साइट (https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html) ला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरताना खूप सावधगिरी बाळगा. कारण, चुकीमुळे पॅन कार्ड दुरुस्त करणे शक्य होणार नाही.

वाचा: Top Plans: जिओच्या २ प्लान्समध्ये बेनिफिट्स सारखेच, तरीही किमतीत ३१ रुपयांचा फरक, पाहा कोणता प्लान आहे बेस्ट?

चूक दुरुस्तीसाठी तुम्हाला सर्वात वरती Application Type वर क्लिक करावे लागेल. Application Type वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Changes or Correction पर्याय निवडावा लागेल. तसेच तुम्हाला Category दिसेल. कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक निवडावे लागेल. जर तुमच्या पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर. यासोबतच तुम्हाला येथे वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल.

वाचा: Smartphone Tricks: नवीन स्मार्टफोनसाठी पैसे का खर्च करता ? जुन्याच फोनच्या सेटिंग्ज बदला, फोन होईल अगदी नव्यासारखा

किती फी भरावी लागेल?

पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ९६ रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला कार्डद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय आहे. तुम्ही डीडीच्या मदतीने पेमेंट देखील करू शकता. डीडी किंवा चेकद्वारे पेमेंट करताना, त्यावर वापरकर्त्याचे नाव असणे देखील आवश्यक आहे. पेमेंट पूर्ण झाल्यावर, पॅन कार्ड विनंती सबमिट केली जाते. येथून तुम्ही सहज पेमेंट करू शकता.

वाचा: Hackers : स्मार्टफोनमध्ये डझनभर App करणाऱ्यांनो व्हा अलर्ट ! ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हॅकर्स मिळविणार तुमच्या फोनचा ताबा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *