‘गेली 5 वर्षे मी प्रयत्न करतेय’, गर्भधारणा होत नसल्यामुळं अभिनेत्रीचा भर कार्यक्रमात आक्रोश


मुंबई : मातृत्त्वाची चाहूल लागते तेव्हा, स्त्रीचा जन्म पूर्णत्वास जातो असं म्हणतात. अर्थात सध्याच्या घडीला मातृत्त्वाच्या संकल्पना बदलल्या आहेत. यामध्ये विज्ञानाचीही मोठी मदत झाली आहे. परिणामी ज्यांना आई होता आलेलं नाही, अशा महिलांनाही मातृत्वाचा अनुभव घेता आला आहे. 

एकाएकी मातृत्त्वाबद्दल बोललं जाण्यामागे निमित्त ठरतंय ते म्हणजे अभनेत्रीनं दिलेली जाहीर कबुली. गेल्या पाच वर्षांपासून आपण आई होत असल्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत त्यात सतत, अपयशाचाच सामना करावा लागत असल्याचं या अभिनेत्रीनं सांगितलं. 

एका रिअॅलिटी शोमध्ये आपल्या खासगी आयुष्याविषयी सर्वात मोठा खुलासा करणारी ही अभिनेत्री आहे, पायल रोहतगी. (payal rohatgi Lock Upp)

पायल आणि संग्राम सिंह गेली 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. गरोदर राहिल्यानंतर लग्न करणार असल्याचा निर्णय तिनं आधीच घेतला, त्यासाठी प्रयत्नही सुरु केले. पण, तसं काहीच होत नसल्यामुळं आपलं लग्नही लांबत असल्याचं पायल म्हणाली. 

आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत असताना Lock Upp या शोमध्ये पायलच्या भावनांचा बांध फुटला. संग्रामला तिनं आपल्या का कमतरतेमुळं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचाही सल्ला दिला. 

संग्रामला जी मुलगी मूल देऊ शकेल तिच्याशी त्यानं लग्न करावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. पण, संग्रामनं तिची साथ आजवर सोडलेली नाही. येत्या दिवसांत आपण सरोगसीचा मार्ग अवलंबणार असल्याचंही ती यावेळी म्हणाली. 

सध्याची पिढी ही त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी झटत असते. पण, असं करत असताना ही पिढी त्यांच्या खासगी आयुष्याला दुय्यम स्थान देते. ज्याचे परिणाम अतिशय गंभीर स्वरुपाचे असतात, असं म्हणत पायलनं स्वत:च्या अनुभवातून इतरांनी शिकवण घ्यावी, असा संदेशही दिला. Source link

Leave a Reply