Headlines

अनेक वर्षे चित्रपट न साकारताही शाहरुखला कशी परवडली ‘ही’ नवी गोष्ट ?

[ad_1]

मुंबई : ‘किंग खान’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. नव्या जोमाच्या अभिनेत्यांनाही या ‘बाजीगर’नं मागं टाकलं. गेला काही काळ शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढ- उतारांचा सामना करत होता. 

अखेर तो या साऱ्यावर मात करत पुन्हा त्याच्या कामावर आणि आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करताना दिसला. सध्या शाहरुख प्रकाशझोतात आला आहे तो म्हणजे त्याच्या ‘मन्नत’ या आलिशान घरामुळं. (Shah rukh khan home mannat)

शाहरुखच्या या घरात आता एक अशी गोष्ट आली आहे, जी पाहता हा अभिनेता गेली काही वर्षे चित्रपटांमध्ये सक्रिय नसतानाही त्याच्या कमाईचा आकडा इतका टिकला कसा, की तो इतकी महागडी वस्तू घेऊ शकला असेही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारले आहेत. 

ज्यामुळं शाहरुखची चर्चा होतेय ती वस्तू आहे, त्याच्या घराची नवी नेम प्लेट. शाहरुखचं घर म्हणजे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी एक पर्यटनस्थळ. अनेकजण तर त्याच्या घराबाहेर असणाऱ्या पाटीसोबतही फोटो काढताना दिसतात. 

सध्याच हीच पाटी पुन्हा आकर्षणाचा विषय ठरत आहे. कारण, आता ही पाटी बदलली असून, तिचं नवं रुप सर्वांसमोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार किंग खानच्या पत्नीनं म्हणजेच गौरी खान हिनं डिझाईन केली आहे. (Gauri khan)

असं म्हटलं जातंय की शाहरुखची पत्नी, गौरी हिनं तिच्या विशेष निरिक्षणामध्ये घराची नवी पाटी तयार करून घेतली आहे. घरासंबंधीचे सर्व महत्त्वाचे निर्णय गौरीच घेताना दिसते. मुख्य म्हणजे शाहरुखचं कुटुंबही तिचे निर्णय हसतमुखानं स्वीकारताना दिसतं. 

शाहरुखच्या घराची नवी पाटी पाहून हेच लक्षात येत आहे. Mannat Land`s End असं या पाटीवर लिहिलेलं दिसत आहे. या पाटीची किंमत 20-25 लाख रुपये असल्याचं कळत आहे. 

कुटुंबाला साजेशी घराची पाटी गौरी तयार करु इच्छित होती, ज्यामुळं तिनं या डिझाईनला पसंती दिल्यालं कळत आहे. तुम्हाला हा नवा बदल कसा वाटला ?  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *