Headlines

प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचे शतक करुन गाव देवराई करा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात इतिहास घडेल- सयाजी शिंदे

पुणे -जांभुळ,चिंच,आवळा अशी 500 झाडे लावून पाच वर्ष जपली तर ते गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. या भुमीवर वाईट झाड जन्माला येत नाही ते कशासाठी व कुणासाठी तरी उपयोगी पडतात फक्त गावात झाडे लाऊन ती जपा असे आवहान सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

सरपंच परिषद मुंबई-महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य, जिल्हा,समन्वयक, अध्यक्ष पदाधिकारी यांच्या समवेत वृक्ष लागवड कार्यक्रम संदर्भात पुणे येथील नवले लाँन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,प्रदेश सरचिटणीस अँड विकास जाधव, पुणे विभागीय वनसंरक्षक,राव विभागीय वनविभाग अधिकारी, उपस्थित होते.

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील प्रत्येक गावात झाड लागवड शतक करण्याचा संकल्प केला आहे.शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर  जांभळ,चिंच व आवळा ही झाडे आर्थिक आधार देणारी आहेत.कोणतेच झाड हे वाईट नसते ते कुणाच्या तरी उपयोगात येते.याची जाणीव ठेवून प्रत्येक गावात 15 आँगष्ट पर्यंत 100 झाडे लावून त्याचा दरवर्षी वाढदिवस करुन पाच वर्ष जपुन आपलं गाव देवराई करा असे  सांगून कोणापुढे हात पसरून किंवा  काहीतरी अपेक्षा ठेवुन सामाजिक काम होत नाही तर ते धन,मन व ध्येयाने करा असे आवहान सयाजी शिंदे यांनी केले.

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात ग्रामिन महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल दत्ता काकडे व ॲड. विकास जाधव व विश्वस्त हे राज्यात ग्रामिन आदर्श महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या पाठीशी मी सदैव राहील.

हे ही वाचा

वृक्ष ही देवरुपी माणसं असुन आता माती,पाणी,वृक्ष यावर काम करणे गरजेचे असुन सयाजी शिंदे यांची वृक्ष लागवडसाठी सरपंच परिषदेचे मागे ताकत उभी राहीली हे आपले भाग्य असून या मोहिमेत सरपंच परिषद शक्ति देईल असा विश्वास सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी दिला.

प्रारंभी प्रदेश सरचिटणीस अँड.  विकास जाधव यांनी राज्यातून उपस्थित असलेले सर्व राज्य व जिल्हा पदाधिकारी यांचे स्वागत केले.राज्यात सरपंच संघटनेचे काम अलौकीक असुन वृक्ष लागवड मोहिमेत राज्यातील  प्रत्येक तालुक्यात किमान पाच गावे निश्चितच सहभागी होतील असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश प्रसिद्धी प्रमुख बापु जगदाळे यांनी केले.यावेळी उपस्थित समन्वयक, सरपंच यांनी वृक्ष लागवड संगोपन याबद्दल अभिनेते शिंदे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा कविता घोडके पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे, शिवशंकर ढवण,अरुण कापसे, दादासाहेब बरबडे,किसन जाधव, अनंत जाधव,संजय शेलार, आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *