शेतकरी उतरले रस्त्यावर… मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन -शंकर गायकवाड

छायाचित्रात मार्गदर्शन करताना व विविध मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी

बार्शी/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये, आज बार्शी-बीड रस्त्यावरील शिराळे पाटीवर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मागील व चालू वर्षी कमी मिळालेला पिकविमा, व्याजासहित ऊस बिले, वीज पुरवठा खंडित करणे, बार्शी सोलापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम, उजनीचे पाणी, टेंभुर्णी ते लातूर रस्त्याचे चौपदरीकरण तसेच रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला पूर्वीप्रमाणेच पाच पट मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शंकर गायकवाड यांनी मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित कार्यालय वरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

त्यावेळी सरपंच काकासाहेब अंकुशे, बालाजी चौधरी, हनुमंत चौधरी, किसन वव्हाळ, लक्ष्मण घावटे, आश्रुबा गायकवाड, नानासाहेब चौधरी, दयानंद चौधरी, निलेश चौधरी, मनोज चौधरी, अनिल सावंत, शिवाजी गायकवाड, सर्जेराव मते, समाधान पाटील, गोटू पाटील, वसंत चौधरी, अक्षय मते, अजित मते, बजरंग चौधरी, सिद्धनाथ चौधरी, सचिन चौधरी, मधुकर चौधरी, सुनील चौधरी, भालचंद्र चौधरी, बापू गायकवाड, श्रीराम डिसले, अतुल चौधरी, दिलीप चौधरी, राजेंद्र चौधरी बाळासाहेब भायगुडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन तहसीलच्या प्रतिनिधी मंडळ अधिकारी सौ सारिका राऊत यांनी स्वीकारले तर पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तोरडमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply