चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले ‘ते’ फोटो म्हणाली…


Prajakta Mali Post After Makar Sankrant : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय आहे. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता गेल्या अनेक दिवसांपासून ‘प्राजक्ताराज’ या तिच्या दागिण्यांच्या ब्रँडमुळे चर्चेत होती. ‘रानबाजार’ या वेब  सीरीजनंतर प्राजक्ता मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra ) मधून प्राजक्ता उत्तम निवेदिका म्हणून दिसत आहे. आता प्राजक्ता एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, प्राजक्तानं नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्तानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. प्राजक्तानं ही पोस्ट शेअर करत संक्रांत झाल्यावर काळ्या कपड्यांवरचे फोटोज् टाकतेय… उशिर झाल्यामुळे माफी मागते. प्राजक्तराज मुळे श्वास घ्यायला फुरसत मिळेना…आणि या गोष्टीचा अतीव आनंद आहे.. त्यामुळे घ्या पदरात… असे कॅप्शन प्राजक्तानं दिलं आहे. 

Prajakta Mali shares Post After Makar Sankrant went viral

प्राजक्ताने काहीच दिवसांपूर्वी अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या नवीन वेबसाईटचे महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. ‘प्राजक्तराज’ असं या वेबसाईटचं नाव आहे. काहीच महिन्यांपूर्वी प्राजक्ताने ‘प्राजक्तप्रभा’ हे तिच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची एक जूनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये प्राजक्तानं खुलासा केला की तिनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत काम केले आहे. प्राजक्ता शाहरुखच्या स्वदेश (Swades Movie) या चित्रपटात प्राजक्ताने काम केलं आहे. हे ऐकून आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे. या चित्रपटात प्राजक्ताने अगदी छोटंसं काम केल्याचे दिसून आले आहे.  

हेही वाचा : कोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं

यावेळी प्राजक्ताने खुलासा केला की, शाहरुख बरोबर काम करताना मी एक नाही तर सतरा वेळा त्याला धडकली होती. त्याचबरोबर तिनं चित्रपटातील तो सीन देखील सांगितला, ज्यामध्ये प्राजक्ता माळीने काम केलं आहे. प्राजक्तानं सांगितले की, तो लायब्ररीमध्ये असतो आणि हिरोईन त्याला पत्ता सांगते तेव्हा शाहरुख तो पत्ता लिहून घेत असतो. यावेळी अभिनेत्री त्याच्याकडून पुस्तक घेते. त्यावेळी शाहरुखला तिला सुट्टे पैसे द्यायचे असतात. मात्र, अभिनेत्री निघून जाते हे पाहता शाहरुख तिच्या मागे जातो. दरम्यान, अभिनेत्रीचा पाठलाग करत असताना शाहरुखला दोन मुलींना धडक द्यायची असते आणि त्यात एक असते प्राजक्ता माळी यावेळी प्राजक्तानं शाहरुखला चक्क 17 वेळा धडक दिली आणि अखेर सीन शूट झाला असा खुलासा प्राजक्तानं केला.Source link

Leave a Reply