Headlines

प्रसिद्ध अभिनेता झालाय प्रेमात आंधळा; आता करणार तिसरं लग्न?

[ad_1]

Pawan Singh Third Marriage: आजकाल बॉलीवूड आणि साऊथ इंडियन चित्रपटांसोबत भोजपूरी सिनेमांचीही खूप क्रेझ आहे. भोजपूरी चित्रपट जगातील सुपरस्टारही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या चित्रपटातील गाणीही इन्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून जोरात व्हायरल होतात. 

भोजपूरी चित्रपट जगातील सुपरस्टार अभिनेता पवन सिंग (Pawan Singh) आपल्या चित्रपटांप्रमाणे आपल्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असतो. पवन सिंगनं अभिनेत्री ज्योती सिंगशी (Jyoti Singh) घटस्फोट घेतल्याची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली होती. ज्योती सिंग यांच्यासोबत पवन सिंगचं हे दुसरं लग्न आहे. यापुर्वी पवन याने प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्रीशी लग्न केलं होते. 

परंतु आता पवन सिंग हा अभिनेता लवकरच तिसरं लग्न करण्याच्या विचार आहे याबद्दल जोरात चर्चा सुरू झाली आहे. पवन सिंग यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. अक्षरा सिंह ही एक प्रसिद्ध भोजपूरी हिरोइन आहे. त्यांनी पवन सिंगसोबत अनेक चित्रपट आणि गाणी केली आहेत. त्यापैंकी अनेक चित्रपट आणि गाणी या दोघांच्या जोडीमुळे सुपरहिट झाली आहेत. 

अक्षरा सिंह (Akshara Singh) पवन सिंहची एक्स गर्लफ्रेंड आहे. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेम होते पण काही कारणाने या प्रेमाचे रुपांतर तिरस्कारात झाले. या दोघांच्या विभक्त झाल्यानंतर त्यांनी आपले करिअर वेगळे निवडले आणि त्यानंतर पवन सिंहने दुसरे लग्न केले.

त्यानंतर पवन सिंग याने ज्योती सिंगशी दुसरे लग्न केले. या लग्नामुळे पवन सिंगची एक्स गर्लफ्रेंड अक्षरा सिंगने पवन सिंगला एक गाणे गायले आणि म्हणाली, “अब किसका घर जलाओगे” जेव्हापासून अक्षराने हे गाणे गायले आणि रिलीज केले, तेव्हापासून हे गाणे ट्रेंडमध्ये आहे. आता हाच अभिनेता तिसरं लग्न करण्याच्या तयारी असल्याचे बोलले जात आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *