
बार्शी / प्रतिनिधी – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे तसेच रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्त वापर झाला पाहिजे असे प्रतिपादन जयसिंग कदम यांनी केले .
मराठी भाषा वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने २७ फेब्रुवारी हा दिवस जेष्ठ साहित्यीक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा गौरव दिन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगार येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
- IPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय
- त्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य
- Women T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड
- Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी
- बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींच्या पदरी कमी वयातच मातृत्त्वं; कोणी 17 व्या वर्षी झाली आई, तर कुणी 22 व्या
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुलाखे हायस्कुलचे शिक्षक जयसिंग कदम व नंदकुमार सोनवणे हे तर अध्यक्षस्थानी आगारप्रमुख मोहन वाकळे , जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बार्शी बसस्थानकात भव्य रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी वाहतुक अधिक्षक नितीन गावडे, वाहतुक नियंत्रक राजेंद्र कवळासे,हेड मॅकनिक नंदकुमार धुमाळ, पंकज सावंत, भाग्यलक्ष्मी माने, पल्लवी जाधव, रेखा सुपेकर, मिनाक्षी मोरे आदींसह सहाय्यक व चालक आणि वाहक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम वाघुलकर व आभार तुषार थोरात यांनी मानले.