अमीर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

मुंबई/वृत्तसंस्था – अभिनेता आमिर खान आणि फिल्म निर्माती किरण राव यांनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर शनिवारी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. दोघांनी सांगितले की आई-वडील या नात्याने मुलांचे संगोपन आम्ही मिळून करू.

दोघांनी एकत्रित दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की पाणी फाउंडेशन आणि इतर योजनांमध्ये आम्ही सोबत काम करत राहू. आमीर खान आणि किरण राव यांची पहिली भेट 2002 मध्ये फिल्म लगान च्या सेटवर झाली होती. त्यांनी डिसेंबर 2005 मध्ये विवाह केला होता.

अमीर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

हे ही वाचा 👉

पुढे ते म्हणाले या पंधरा वर्षात आम्ही अनुभव ,आनंद आणि सुखदुःख एक दुसर्यासोबत शेअर केले आहेत. आम्ही आमच्या आयुष्यात आता पती – पत्नी म्हणून नाही तर एक दुसऱ्यासाठी सह माता-पिता आणि परिवारासाठी एक नवा अध्याय सुरू करू इच्छित आहेत. त्यांनी दिलेल्या वक्तव्यात असे म्हटले आहे की आम्ही काही वेळा पूर्वीपासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू सुरू केली होती.

कयामत से कयामत तक , सरफरोश , थ्री इडीयट्स , तलाश आणि दंगल अशा बहुचर्चित चित्रपट स्टार आमिर खान यांनी रिना दत्त यांच्याशी पहिला विवाह केला होता. रीना यांच्यापासून आमिर खान यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Leave a Reply