रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सोलापूर विभागातील  विद्युतीकरण आणि दुहेरीकरण कामांची पाहणी

भिगवण / एबीएस न्यूज नेटवर्क – वाशिंबे सेक्शन 9 ऑगस्ट रोजी NI उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला.  भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम आज पूर्ण झाले आहे.  त्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे. 

असा होता हा मार्ग – भिगवण ते वाशिंबे हा भाग २८.४८ किमीचा असून त्यात ४ स्थानके उदा., भिगवण, जिंती रोड, पारेवाडी आणि वाशिंबे यांचा समावेश आहे.  उजनी धरणातील 41 छोटे पूल आणि 3 मोठे पूल समाविष्ट असल्याने हा सेक्शन महत्त्वाचा होता. 

या विभागात 9 RUB आणि 1 ROB देखील आहेत.  NI चे कार्य 25 जुलै पासून सुरु झाले आणि NI चे काम 9 ऑगस्ट रोजी पूर्ण झाले.  या विभागाचे विद्युतीकरणही एकाच वेळी पूर्ण झाले. NI दरम्यानच्या प्रमुख कामांमध्ये कट आणि कनेक्शन, TWS समाविष्ट करणे इत्यादींचा समावेश होता.

“दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल.  गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येने प्रवासी गाड्या धावण्यासही मदत होईल.” – प्रदिप हिरडे

कामपूर्ण करण्यासाठी मशीन आणि मनुष्यबळाचा उपयोग –  हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण 600 मजूर रात्रंदिवस काम करत होते. हे काम ऐन मॉन्सून जोमात असतानाही पावसाची पर्वा न करता रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांनी पूर्ण करण्यामध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले.  या कामामध्ये T28 मशीन, पॉइंट्स आणि क्रॉसिंग मशीन, टॅम्पीग मशीन, 4 हायड्रा, 4 हिटाची, 4 जेसीबी इत्यादी प्रमुख मशिन्स चा समावेश होता.

प्रवासाचा वेग वाढणार ,वेळ वाचणार – CRS तपासणी दरम्यान स्पीड टेस्ट देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली. या स्पीड टेस्ट दरम्यान 120 kmph इतका कमाल वेगाने इंजिन धावले. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल.  गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येने प्रवासी गाड्या धावण्यासही मदत होईल.

रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री मनोज अरोरा यांनी 8 आणि 9 ऑगस्ट रोजी कामाची पाहणी केली.  CRS तपासणी दरम्यान, DRM श्री शैलेश गुप्ता, CAO श्री मनोज शर्मा, CE श्री रजनीश माथूर, दिनेश कटारिया, Sr DEN CO श्री चंद्रभूषण, CPM श्री आनंद स्वरूप आणि सोलापूर विभागातील इतर शाखा अधिकारी इत्यादी उपस्थित होते. 

Leave a Reply