एका मिनिटात १०० किलो पेढे गायब; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी | eknath shinde aurangabad paithan tour people steal sweetsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेआधी येथील जनतेची भेट घेतली. याच भेटीगाठीदरम्यान एक अजब प्रकार पाहायला मिळा आहे. मुख्यमंत्र्यांनी पेढातुला नाकारताच तेथे ठेवलेल्या पेढ्यांवर लोक तुटून पडले. लोकांनी ११० किलो लाडू आणि १०० किलो अवघ्या एका मिनिटात गायब केले. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

हेही वाचा >> ‘…तर तुमच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगेन,’ पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण राणे भडकले; नेमकं काय घडलं?

मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठण येथे शिंदे यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी बिडकीन येथे मुख्यमंत्र्यांची पेढेतुला आयोजित करण्यात आली होती. मात्र ही पेढेतुला एकनाथ शिंदे यांनी नाकारली. त्यानंतर पेढेतुलेसाठी आणलेले पेढे पळवण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्वागत समारंभाकडे शिंदे यांनी पाठ फिरवताच जमलेल्या गर्दीने लाडू आणि पेढे पळवले. अवघ्या एका मिनिटात १०० किलो पेढे तसेच ११० किलो लाडू जमलेल्या गर्दीने पळवले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांची पेढेतुला करण्यात आली होते. त्यावेळीही असाच प्रकार पाहायला मिळाला होता.

हेही वाचा >> आधी पुत्र अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग, आता पिता राज ठाकरेंचे गणेशोत्सवावर थेट भाष्य; म्हणाले…

सभेला गर्दी व्हावी म्हणून पैसे वाटले?

मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून संदीपान भुमरे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सभेला जमण्यासाठी लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव टाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. तर हा आरोप भुमरे यांनी फेटाळून लावला आहे. ही ऑडिओ क्लीप विरोधकांनीच बनवली असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.Source link

Leave a Reply