एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार…. पाहा व्हिडीओ


मुंबई : आयपीएलमध्ये 63 वा सामना राजस्थान विरुद्ध लखनऊ यांच्यामध्ये खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना जिंकून प्लेऑफपर्यंत जाण्याचे निश्चित केलं आहे. या सामन्यात एक हैराण करणारा कॅच पाहायला मिळाला. 

राजस्थानच्या दोन खेळाडूंनी अजब कॅच पकडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका पॉईंटला असं वाटलं की हे दोघंही कॅच ड्रॉप करतील पण घडलं काहीतरी वेगळंच.

राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्यात एक उत्तम कॅचचा व्हिडीओ समोर आला आहे. टीमवर्क काय असतं ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आतापर्यंतचा हा सर्वात सुंदर कॅच असल्याचं पाहायला मिळालं. 

कृणाल पांड्याला आऊट करण्यासाठी रियान पराग आणि जोस बटलर यांनी मिळून कॅच पकडला. 14 व्या ओव्हरमध्ये रविचंद्र अश्विन बॉलिंग करत होता. कृणालला आऊट करण्यासाठी रियान आणि जोस बटलर दोघांनीही कॅच घेण्याचा प्रयत्न केला. 

जोस बटलरने आधी हा बॉल हवेत उडी मारून पकडला. कॅच सुटू नये म्हणून त्याने रियान परागकडे हा बॉल फेकला. रियानने पूर्ण कौशल्यानिशी हा बॉल पकडला आहे. जोस बटलरने याआधी 52 व्या मॅचमध्ये एका कॅच पकडला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध एका हाताने शिखर धवनने कॅच पकडला होता. 

राजस्थान टीमने 24 धावांनी सामना जिंकला. संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थाननं 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमवून 178 धावा केल्या. 

लखनऊला 179 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊ टीमने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. 24 धावांनी राजस्थान टीम सामना जिंकली. Source link

Leave a Reply