Headlines

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

[ad_1]

मुंबई : बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्यानं पाहता पाहता लोकप्रियतेचं शिखर गाठलं. ही लोकप्रियता त्याला मिळणाऱ्या मानधाचा आकडाही वाढवून गेली. आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो. 

अनुभव आणि अभिनय या दोन्ही घटकांच्या बळावर या अभिनेत्यानं गेली काही दशकं नवख्या कलाकारांनाही टक्कर दिली. पण, या साऱ्यामध्ये कुठेच ही प्रसिद्धी त्याला गर्वाच्या दारी घेऊन गेली नाही. 

इतकी कमाई करुनही, आलिशान वाहनांतून फिरुनही, मोठाल्या घरात राहुनही हा अभिनेता आतासुद्धा त्याला मिळणाऱ्या खर्चाच्या पैशांतूनच महिनाभर काढतो. 

हा अभिनेता आहे स्वप्नील जोशी. आजही मी मला मिळणारे सर्व पैसे हे आई-बाबांकडे देतो आणि त्यातून ते मला महिन्याभरासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे देतात असं त्यानं सांगितलं. 

नुकतंच किचन कल्लाकार या कार्यक्रमात त्यानं हजेरी लावली होती, तेव्हा स्वप्नीलनं याबाबतचा खुलासा केला. 

आजच्या घडीलासुद्धा मला महिन्याचा खर्च करण्यासाठी ठराविक रक्कम मिळते. ज्याचा मला हिशोबही द्यावा लागतो. बरं ते पैसे महिना संपायच्या आधी संपले, तर ते का संपले याचं कारणंही द्यावं लागलं. ते जर आईबाबांना पटलं, तरच मला वरचे पैसे मिळतात, नाहीतर आहे त्या परिस्थितीत महिना भागवावा लागतो, असा उलगडा त्यानं केला. 

For me, romance is SRK: Swapnil Joshi

हिशोब आणि एकंदरच पैशांच्या बाबतीत स्वप्नीलच्या घरचं वातावरण आणि त्याला असणारी ही चांगली सवय यानिमित्तानं सर्वांसमोर आली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *