Headlines

dussehra melawa at shivaji park shivsena chandrakant khaire slams cm eknath shinde group

[ad_1]

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावर आज अखेर पडदा पडला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार? यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून न्यायालयात याचा निवाडा झाला आहे. शिवसेनेला येत्या ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक आनंद व्यक्त करत असताना शिंदे गटाला हा मोठा फटका मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी एबीपीशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यांनी शिंदे गटावरही तोंडसुख घेतलं आहे.

काय झाला निर्णय?

दसरा मेळाव्यासंदर्भात आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं शिंदे गटाची यासंदर्भातली याचिका फेटाळून लावली. तसेच, मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने अर्ज नाकारल्याची टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.

काय म्हणाले खैरे?

दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरेंनी हा कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. “मी न्यायपालिकेला धन्यवाद देतो. त्यांनी कोट्यवधी शिवसैनिकांना न्याय दिला. पण हा विजय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, उद्धव ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा आणि कोट्यवधी शिवसैनिकांचा आहे. मी मोठ्या चिंतेत होतो. पण आम्हाला न्याय मिळाला”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

“शिवसेनेची सत्ता पुन्हा पालिकेत येणार नाही का?”

“किती छळायचं. जी महापालिका अनेक वर्षांपासून आपली होती, तिथले अधिकारीही या सगळ्या प्रकारात होते. पालिका आयुक्तांना आपण बसवलं. त्यांनी किमान शिवसेनेला न्याय द्यायला हवा होता. पण त्यांनी तसं नाही केलं. शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार नाही का? आमची सत्ता पुन्हा येणार. सदा सरवणकरांनी गोळीबार वगैरे केला. अजून त्यात काही झालेलं नाही.कायदा आणि सुव्यवस्था कशी पाळत आहेत हे लोक हे दिसतंय”, असं म्हणत खैरेंनी शिंदे गटावर तोंडसुख घेतलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *