Headlines

निंबोणीत रक्तदानाने डॉ.दाभोळकर यांना आदरांजली

मंगळवेढा /विशेष प्रतिंनिधी – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,मंगळवेढा व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व समस्त ग्रामस्थ निंबोणी यांच्या वतीने महा. अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा दि. 20 ऑगस्ट रोजी आठव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून निंबोणी ता.मंगळवेढा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्ताने 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी दाभोळकर यांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प अंनिस कार्यकर्त्यांनी केला.डॉ.दाभोळकरांच्या भ्याड हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली.मात्र त्यांचे मारेकरी व मुख्य सूत्रधार सापडत नाहीत.राज्यात सत्तांतर झालेतरी हत्येची पूर्णपणे उकल झालेली नाही.पुरोगामी महाराष्ट्रात आणि देशात विचारवंतांचे बळी असेच पडत राहणार का? असा सवाल यानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनात उमटत आहे.


दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन,शहीद दिन व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.यावेळी मंगळवेढा अंनिसचे सर्व कार्यकर्ते,तांत्रिक युनियन विद्युत क्षेत्रचे पदाधिकारी व निंबोणी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *