डोळ्यात पाणी आणेल असा हा मायलेकाचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल


मुंबई : आईचं तिच्या मुलासोबतचं नातं हे फार घट्टं नातं आहे. आई मुलाला आपल्या पोटात नऊ महिने वाढवते. इतकंच काय तर त्याला लहानाचं मोठं करते. त्याला काय हवं नकोते पाहाते. आई आपल्या बाळाला आपल्या प्राणापेक्षाही जास्त जपते. त्यामुळे आपल्या मुलाला काहीही झालं तरी आईच्या डोळ्याच चटकन पाणी येणे. त्यामुळे आईच्या प्रेमाशी आपण कधीही तुलना करु शकत नाही. आपण नेहमीच आईला आपल्या मुलावर प्रेम करताना पाहिलंय, परंतु आपल्या आईची काळजी घेताना आणि प्रेम करताना आपण फारच कमी पाहिलं असेल.

आजच्या काळात तर लोकं लग्न झाल्यानंतर आईपासून वेगळे होतात. मग ती मुला असो किंवा मुलगी. पटत नाही म्हणून लोक वेगवेगळे राहू लागतात. त्यात सध्याच्या बिझी आयुष्यामध्ये लोकांना एकमेकांकडे द्यायला वेळ नसतो, ज्यामुळे आई वडिलांकडे पाहण्यासाठी देखील लोकांकडे वेळ नसतो.

या सगळ्यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहाणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलाने असे काही केलं आहे, जे पाहून लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

आयपीएस अधिकारी दीपांशु काब्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आई-मुलाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या वृद्ध आईवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आईला थंडी वाजू नये म्हणून मुलगा आईच्या डोक्याला स्कार्फ म्हणजेच कानटोपरा बांधत आहे.

या मुलाची आई म्हातारी असल्यामुळे तिला कानटोपरा घालता येत नाही. या कारणासाठी मुलानेच तिला कानटोपरा बांधला. ही संपूर्ण घटना खूपचं भावनीक आहे.

या मुलाला असं आपल्या आईवर प्रेम करताना पाहून सर्वांनात पुन्हा एकदा श्रावण बाळाची आठवण झाली आहे. या मुलाने अशी कामगिरी करून केवळ आयपीएस अधिकारीच नाही तर सर्व सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकली आहेत.

‘मुलगा असावा तर असा’

व्हिडीओ शेअर करताना आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेटा हो तो ऐसा.. आजही श्रवण बाळासारखे पुत्र आहेत. हे पाहून आनंद झाला. प्रत्येक घरात असे मुलगे असावेत, जेणेकरून समाजाला वृद्धाश्रमाची गरज भासू नये.’ हा व्हिडीओ केवळ 5 सेकंदांचा आहे, मात्र अशा छोट्या व्हिडीओने लाखो लोकांचे लक्ष वेधले आहे.Source link

Leave a Reply