Headlines

Dog Walking Stadium: एका श्वानामुळं IAS अधिकाऱ्याची रखरखाट असणाऱ्या प्रदेशात बदली, नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

मुंबई : देशभरातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. या ना त्या कारणाने या बदल्या होत असतात. मात्र या घटनेत काही वेगळचं कारण समोर आले आहे. एका IAS अधिकाऱ्यांची त्याच्या पाळीव श्वानामुळे बदली करण्यात आली आहे. संजीव खिरवार असं त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. नेमकंश्वानाने असं काय केलं आहे की संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांची बदली झाली आहे, जाणून घ्या…

प्रकरण काय ? 
दिल्लीत त्यागराज (Thyagraj Stadium) नावाचं एक भलं मोठ स्टेडिअम आहे. या स्टेडिअममध्ये दररोज हजारो खेळाडू प्रॅक्टीस करतात. मात्र ज्या ट्रॅकवर खेळाडू घाम गाळतात, तो ट्रॅक श्वानासोबत फेरफटका मारण्यासाठी रिकामा केला जातो, असा आरोप दिल्लीचे आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्यावर केला जात आहे.  खिरवार हे रोज रात्री साडे आठ वाजता त्यागराज स्टेडियममध्ये श्वानाला घेऊन फिरायला येतात. साधारणतः खेळाडूंसाठी ही सरावाची वेळ असते. पण खिरवार यांच्यासाठी हे स्टेडियम रिकामं केलं जातं असल्याचा आरोप आहे, पण आपल्यावरचे सगळे आरोप खिरवार यांनी फेटाळले.यामुळे संजीव खिरवार त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरण्यावरून वादात सापडले होते.  

स्टेडियममध्ये श्वानाला फिरवण्याचा वाद त्यांना चांगलाच भोवला आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये श्वानाच्या फिरण्याच्या घटनेनंतर IAS संजीव खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली आहे. तर त्यांची आयएएस पत्नी रिंकू दुग्गा यांना अरुणाचल प्रदेशात पाठवण्यात आले आहे.
आता संजीव खिरवार कोण आहेत  आणि दिल्ली सरकारमध्ये नेमके ते कोणत्या पदावर होते याची माहिती जाणून घेऊयात. 

कोण आहेत संजीव खिरवार ?
दिल्लीचे रहिवासी असलेले संजीव खिरवार हे AGMUT कॅडरचे 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते दिल्ली सरकारमधील प्रभावी अधिकारी होते. त्यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती होती. दिल्ली सरकारमध्ये तीन महत्त्वाच्या खाती असणारे ते एकमेव अधिकारी होते. 50 वर्षीय संजीव खिरवार यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले असून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. त्यांचे लग्न 1994 च्या बॅचच्या IAS रिंकू दुग्गाशी झाले, जी मूळची हरियाणाची आहे.

खिरवार यांच्याकडे कोणते पद होते ? 

संजीव खिरवार हे विभागीय आयुक्त असण्यासोबतच दिल्लीतील महसूल विभागाचे प्रधान सचिव होते. यासोबतच ते नगरविकास आणि वन व पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांचा पदभारही सांभाळत होते. यापूर्वी त्यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदाचा कार्यभारही सांभाळला आहे.

संजीव खिरवार यांनी आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत अरुणाचल आणि अंदमान निकोबारमध्ये सचिव, गोव्यात उत्पादन शुल्क आणि वित्त आयुक्त, पश्चिम दिल्लीचे उपायुक्त म्हणून काम केले आहे. ते ऑक्टोबर 2009 आणि ऑगस्ट 2014 मध्ये केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते, जिथे त्यांना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

1994 मध्ये निवड झाल्यानंतर खिरवार यांची पहिली पोस्टिंग चंदीगडमध्ये एसडीएम म्हणून झाली. यानंतर त्यांनी दिल्लीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महसूल, वित्त आणि सामान्य प्रशासन विभाग सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. याशिवाय 2006-07 मध्ये दिल्ली सरकारमध्ये कृषी पणन मंडळात अतिरिक्त सचिव आणि उत्पादन शुल्क आणि कर विभागामध्ये आयुक्त म्हणून काम केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *