दिवसा दीदींच्या घरी काम, रात्री अभ्यास; पाहा कोण होता मंगेशकर कुटुंबातील हा विश्वासार्ह माणूस?


मुंबई : वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. वाढतं वय आणि खालावलेली प्रकृती यांपुढे अखेर त्यांच्या जगण्याच्या जिद्दीने हात टेकले. दीदी गेल्या पण त्यांनी अनेक आठवणी मागे सोडल्या. (lata Mangehskar news )

दीदींचं आयुष्य हे इतकं मोठं होतं. की यामध्ये त्यांनी पिढ्या बदलताना आणि घडताना पाहिल्या. दीदींच्या आयुष्यात येणारे अशा किती व्यक्ती आहेत ज्या त्यांच्या सोबत असण्यानंही धन्य झाल्या. 

अशीच एक व्यक्ती म्हणजे त्यांच्याकडे 27 वर्षांपासून सेवेत असणारा महेश राठोड. 

महेश बऱ्याच अपेक्षा मनात ठेवून 1995 मध्ये मुंबईत आला होता. इथे स्वप्नांचा पाठलाग करत असतानाच त्याचा एका व्यक्तीकड़ून मंगेशकरांच्या घरी कामासाठी माणसाची गरज असल्याचं कळलं. 

महेश त्यांच्या घरी आला आणि पाहता पाहता तो या कुंटुंबाचाच होऊन गेला. फक्त केअरटेकरच नाही, तर तो दीदींचा हिशोब तपासनीस होता असंही म्हटलं जातं. 

महेश जिद्दी होता. सकाळी तो नेमून दिलेलं काम करायचा आणि रात्रीच्या वेळी अभ्यास, असं करत करत त्याने त्याचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. 

आपण लतादीदींसाठी काम करतो हे त्यानं जेव्हा कुटुंबीयांना सांगितलं तेव्हा त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. जवळपास 4 वर्षांनंतर जेव्हा त्यानं दीदींसोबतचा फोटो दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. 

लतादीदींचा विश्वास महेशनं जिंकला होता. त्यांनी त्याला राखीही बांधली होती. इतकंच काय, तर त्याच्या तिन्ही मुलींची नावंही दीदींनीच ठेवली होती. 

ज्यांच्यासाठी आपण काम करतो, ते खुद्द देवाचंच मानवी रुप आहेत याची त्याला जाणीव होती. म्हणूनच की काय दीदींच्या निधनाची बातमी आली आणि महेश तुटला. 

एक हक्काचं माणूस, मायेचा हात आणि मोठा आधार आपण कायमचा गमावला या भावनेनं त्याच्या आसवांचा बांध फुटला. 

दीदींच्या जाण्याने सगळंकाही बदललंय, असं म्हणणारा महेश अजूनही या दु:खातून सावरतोय. Source link

Leave a Reply