Headlines

कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा – माजी मंत्री दिलीप सोपल

बार्शी – कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा असे मत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी मोहसीन तांबोळी मित्र मंडळ यांच्यावतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या 1451 व्या जयंतीनिमित्त आयोजित 1451 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले काहीप्रमाणात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची ओळख विसरलेल्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप हा कौतुकास्पद उपक्रम आहे. पालकांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी मोहसिन तांबोळी यांच्या लक्षात आल्या. कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर सुद्धा हा उपक्रम अखंडितपणे सुरू ठेवावा. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आपण कार्य केल्यास आपल्याला मानसिक समाधान लाभेल. तसेच यावेळी त्यांनी कोरोनापूर्वीच्या जुलूसच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमात बोलताना बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले की प्रेषित मोहम्मद पैगंबर हे एकात्मतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारे संत होते. संतत्व हे जीवनातील संघर्षाने प्राप्त होत असते. माजी नगरसेवक वाहिद शेख म्हणाले की प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी विधवेचा सन्मान करायला शिकवलं. विधवा पुनर्विवाहाची सुरुवात केली.

या कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले.उर्वरित विद्यार्थ्याना साहित्य घरपोच करण्याचे नियोजन आखले असल्याची माहिती मोहसिन तांबोळी यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण , वंचित बहुजन आघाडीचे शोएब सय्यद , माजी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे , माजी नगराध्यक्ष गणेश जाधव , नगरसेवक बापू जाधव , बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे , जावेद तांबोळी , विनोद वाणी , हाजी फरीद साब सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहसिन तांबोळी , सूत्रसंचालन आबेद सय्यद , आभार प्रदर्शन अबुशेखयांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इरफान बेग, जाकीर शेख, जूनैद शेख, रिजवान तांबोळी, इम्तियाज शेख, अझर काझी, मूसैब कूमठे, शाहीद तांबोळी, शाहबाज शेख आदींनी परिश्रम घेतले.

  • या शालेय साहित्य किट मध्ये
  • १) व्हया ६
  • २) परीक्षा पॅड १
  • ३) कम्प्स बॉक्स १
  • ४) कम्प्स साहित्य १
  • ५) पेन्सिल २
  • ६) पेन २
  • ७) पाणी बॉटल १
  • ८)इरेजर १
  • ९)शॉपनर १
  • १०) मास्क २
  • ११) सॅनिटायजर १(१००मिली)
  • १२) स्वीट कॅण्डी ५ ते १० समावेश आहे.

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आचरण करावे.असं म्हणत खिदा का डर नहीं मेरे चमन के फुलों को , मैं जिंदा हुं , जिंदा रखो मेरे वसुलो को या ओळींचे वाचन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *