AgricultureBreaking Newssocial activity

शेतकर्‍यांना मोफत सात बारा आठ अ चे वाटप

शिवराई फाउंडेशन यांच्या वतीने रानमसले गावात शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम

सोलापूर /प्रतिंनिधी – वडाळा महसूल मंडळामध्ये मध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा आठ-अ  प्रिंट काढण्यासाठी 58/60 रुपये खर्च होत होते.  तो खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदती साठी शिवराई फाउंडेशन यांच्याकडून 317 शेतकऱ्यांना सातबारा उतारा, आठ अ , मोफत फ्री मध्ये देण्यात आले. यावेळेस शिवराई फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद गरड , रानमसले ग्रामपंचायतचे उपसरपंच बालाजी गरड , ग्रामपंचायत सदस्य गोपाळ गरड शिवराई फाउंडेशनचे सदस्य शुभम शिंदे, रानमसलेतील शेतकरीवर्ग उपस्थित होते.या उपक्रमास शेतकर्‍यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला व नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.या वेळी बोलताना  अध्यक्ष यांनी शेतकरी व गावकर्‍यांच्या अडचणी वेळी शिवराई फाउंडेशन वेळोवेळी मदती साठी धावून येईल असा विश्वास व्यक्त केला.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!