दिलीप जोशी यांचं दिशा वकानीबाबत मोठं वक्तव्य म्हणाले, 4 वर्षांपासून एकमेकांशी बोललो नाही…


मुंबई : टीव्ही अभिनेत्री दिशा वकानी उर्फ ​​दया बेन गेल्या ५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा भाग नसली तरी गेल्या पाच वर्षांपासून तिची सतत चर्चा होत आहे. या शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी ही प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक होती. ज्याला चाहते अजूनही मिस करतात. दिशा शोमध्ये परतणार की नाही हे माहीत नाही.

मात्र या परतीच्या बातम्यांदरम्यान दयाबेनचा पती जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. दिलीप जोशी यांनी खुलासा केला आहे की, मी आणि अभिनेत्री 4 वर्षांपासून एकमेकांशी बोललोच नाही.

एका मुलाकतीत बोलताना दिशा म्हणाली, ”खरं सांगायचं तर दिशा जी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि तिने शो सोडल्यापासून आम्ही एकमेकांशी बोललो नाही. तिच्याबद्दल जे काही ऐकायला मिळतं ते प्रॉडक्शन हाऊसमधूनच ऐकायला मिळतं. तिला तिच्या कुटुंबाला प्राधान्य द्यायचं आहे हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला तिने आपल्या आयुष्यातील 10 वर्षे दिली याचा आपण आदर केला पाहिजे असं मला वाटतं. आता, तिचं प्राधान्य तिचं कुटुंब आहे आणि आपण तिला त्रास देऊ नये. शेवटी, ती देखील एक कलाकार आहे आणि जेव्हा तिला अभिनय करण्याची उर्मी वाटेल तेव्हा ती परत येईल.

‘मी दिशाला मिस करतो’
दिलीप जोशी म्हणाले, ‘होय, मला दिशाजीची आठवण येते. आम्ही 10 वर्ष एकत्र काम केलं आहे. पहिल्या दिवसापासून आमची ट्यूनिंग आणि केमिस्ट्री मस्त झाली होती आणि आम्ही एकत्र काम करताना खूप चांगला वेळ घालवला. आम्ही गेल्या 10 वर्षांत काही सुंदर सीन शूट केले आहेत आणि खूप छान वेळ घालवला आहे. अर्थात कॉमेडीच्या बाबतीत दिशा जी पहिल्या क्रमांकाची कलाकार आहे.

ती एक अप्रतिम आणि मस्त अभिनेत्री आहे. केवळ एक अभिनेता म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणूनही मला तिला ऑनस्क्रीन पाहायला खूप आवडतं. कधी-कधी मी जुन्या क्लिप्सही बघतो आणि मला वाटतं की हा सीन कधी झाला. गेल्या 10 वर्षांत मी तिच्यासोबत अनेक सीन केले आहेत. मलाही ते सीन्स बघायला मजा येते. होय, व्यक्तिशः मला दिशाजींची खूप आठवण येते.Source link

Leave a Reply