Headlines

‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…” | Sharad Pawar on Eknath shinde given cm post and devendra fadnavis as deputy cm svk 88 scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर राज्यामध्ये नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारसंदर्भातील एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या शरद पवार यांना राज्यामधील शिंदे सरकारच्या स्थापनेच्या वेळेस एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये पण खोचकपणे उत्तर दिलं.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच दिवशी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे. पण भाजपमध्ये वरिष्ठांच्या आणि नागपूरच्या आदेशाबाबत तडजोड करता येत नाही हे फडणवीस यांनी दाखवून दिल्याचा बोचरा चिमटा काढला होता. आता याच विषयावरुन पुन्हा एकदा त्यांना पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी अशाच पद्धतीचं उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंच्या ‘बंडखोर गद्दार’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांना काय…”

“दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले,” असं म्हणत एका महिला पत्रकाराने शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर उत्तर देताना पवार यांनी, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” उत्तर दिलं. त्यानंतर हसत दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या पत्रकारांकडे पाहत, “त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी, असे मत यापूर्वी पवार यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यासंदर्भात नोंदवलं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *