Headlines

Deepika Padukone Net Worth: दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती माहिती आहे का? जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचं (Deepika Padukone) नाव येतंच. तिने राम लीला, पद्मावत, ये जवानी है दिवानी, बाजीराव मस्तानी आणि चेन्नई एक्सप्रेस सारख्या चित्रपटात दमदार अभिनय करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे दीपिका आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात दमदार अभिनेत्री बनली आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला दीपिकाच्या (Deepika Padukone Net Worth) एकूण संपत्तीबद्दल माहीती देणार आहोत, तसेच ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती पैसे घेते, याचीही माहिती देणार आहोत. 

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone Net Worth) तिच्या चित्रपटासाठी प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती राहिली आहे. पण तिची फी एकूण प्रत्येकजण दीपिकाला साइन करू शकत नाही.

एका चित्रपटाची फी? 
दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) फीबद्दल टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दीपिका एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये फी घेते. मात्र, ही फी दीपिकाच्या चित्रपटातील भूमिकेच्या मूल्यावरही बरीच अवलंबून असते.

एकूण संपत्ती किती?
दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone Net Worth) एकूण संपत्तीची चर्चा होत असताना, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची एकूण संपत्ती 314 कोटी रुपये आहे. तुम्हाला सांगतो दीपिका ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिची एकूण संपत्ती 300 कोटींच्या पुढे आहे.

दरम्यान दीपिकाच्या (Deepika Padukone Net Worth) वर्कफ्रंटवर बोलायच झालं तर येत्या काळात ती पठाण या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे.दीपिकाचा पठाण पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *