Headlines

दस्यमुक्ती चा दास कॅपिटल हा आमूलाग्र ग्रंथ – कॉ.नरसय्या आडम (मास्तर)

साम्यवादी विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त माकप कडून विनम्र अभिवादन !

सोलापूर – अनादी काळापासून शोषकांकडून नाही रे वर्गावर दमनशाही चालत आलेली होती त्यांचे जीवन दारिद्र्यात,गुलामीत पिचत पडले होते.यामुळे वर्गसंघर्ष उफाळून आला.अशा या वर्गसंघर्षातून वर्गविरहित समाज निर्माण करण्यासाठी दास्यमुक्ती महत्वाची होती.याचा साकल्याने अभ्यास करून दास कॅपिटल या आमूलाग्र ग्रंथाची निर्मिती करून भांडवली व्यवस्था हादरून सोडले. माणसाकडून माणसांची होणारी पिळवणूक थांबली पाहिजे तरच देशाला प्रगतीकडे नेणारा समाजवाद अस्तित्वात येईल.साम्यवाद हे जगाचे भविष्य आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी कार्ल मार्क्स यांना अभिवादन करताना व्यक्त केले.

गुरुवार दिनांक 5 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दत्त नगर पक्ष कार्यालय येथे माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्ल मार्क्स यांच्या 202 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी एम.एच.शेख म्हणाले की, उत्पादन साधनांची मालकी ही सामुदायिक व्हावी,उत्पन्नाचे समान वितरण व्हावे.लोकांची क्रयशक्ती व राहणीमानीचा दर्जा उंचावली पाहिजे.यासाठी शोषण व वर्ग विरहित समाज निर्माण झाला पाहिजे. हे विचार जगात झंझावात निर्माण केले होते.

यावेळी सिध्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हेत्रे,अनिल वासम,दत्ता चव्हाण,बाळकृष्ण मल्ल्याळ, वीरेंद्र पद्मा, सनी आमाटी,मल्लेशाम कारमपुरी, किशोर गुंडला,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *