Headlines

CWG 2022: सुवर्णपदक जिंकू न शकल्याने पूजा गेहलोतने मागितली देशाची माफी, पंतप्रधान मोदी म्हणाले…

[ad_1]

CWG 2022: भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत जोरदार कामगिरी करत आहेत. 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 13 सुवर्ण पदकांसह 40 पदके जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.  

शनिवारी कुस्तीपटू पूजा गेहलोतची (Pooja Gehlo) कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली. पूजाने 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकता न आल्याने स्पर्धेनंतर पूजाने देशाची माफी मागितली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजासाठी खास संदेश दिला आहे. 

“सेमीफायनलमध्ये कुस्ती हरल्याने जास्त दुखः होत आहे. मी देशवासियांची माफी मागते. इथे भारताचं राष्ट्रगीत वाजवलं जावं असं मला वाटत होतं पण तसे झालं नाही. इथे कुस्ती खेळताना ज्या चुका झाल्या आहेत त्यावर काम करणार आहे,” असे पूजाने सांगितले.

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत अनेक पदके जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक केले. महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पूजा गेहलोत भावूक झाली.

पूजा गेहलोतने लोकांची माफी मागितल्याचा व्हिडिओ टॅग करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पूजा, तुझी पदकासाठी उत्सव व्हायला हवा, माफी नाही. क्षमायाचना. तुढा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो, तुझे यशाने आम्हाला आनंद झाला आहे. तुमच्या नशिबात अनेक अद्भुत गोष्टी आहेत. चमकत राहा.”

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटनंतर पूजा गेहलोतला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हे खेळात नेहमी विजय आणि पराभव असतोच. तरीही पूजाने देशासाठी किमान रौप्य पदक मिळवून दिले आहे, ही एका खेळाडूसाठी मोठी गोष्ट आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 40 पदके जिंकली असून त्यात 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *