‘कस्टडी’ चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूडची कॉपी; वाढदिवसाच्या दिवशी Naga Chaitanya च्या चाहत्यांनी सुनावलं


मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नागा चैतन्य हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आज 23 नोव्हेंबर रोजी नागा चैतन्यचा 36 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याला चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं नागा चैतन्यनं त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नागा चैतन्यनं त्याचा आगामी तेलगू चित्रपट ‘कस्टडी’च्या (custody) पोस्टर शेअर केलं आहे. 

हेही वाचा : ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करणारी मुलगी रातोरात झाली Social Media स्टार, पाहा Viral Video

नागा चैतन्यनं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘कस्टडी’ (custody Poster) चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. हे पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटाचा हा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टमध्ये नागा चैतन्यचे फक्त डोळे दिसत आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा गळा पकडला आहे, तर दुसरे पोस्टर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या दुसऱ्या पोस्टरमध्ये तो पोलिसांच्या ‘कस्टडी’मध्ये आहे आणि अनेक पोलिस त्याच्यावर बंदुका दाखवतात. नागा चैतन्यचे दोन्ही लूक खूपच इंटेन्स आहेत. 

पाहा पोस्टर –

नागा चैतन्यच्या या पोस्टरवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘व्वा हा चित्रपट पाहण्यासाठी मी उस्तुक आहे.’ दुसऱ्या नेटकरी म्हणाला, ‘ये मास लग रही है, इस में हिंदी मैं भी ले आते’. तर काही नेटकऱ्यांनी हे पोस्टर हॉलिवूड चित्रपट ‘जॉन विक चॅप्टर २’ ची कॉपी म्हणत आहेत. अनेकांनी ‘पोस्टर कॉपी’ असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला फक्त रोमँटिक चित्रपट करण्याचा सल्ला दिला. (naga chaitanya film custody first poster out on his 36th birthday users trolled with john wick 2 )

नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाची निर्मिती श्रीनिवास चित्तुरी श्रीनिवास सिल्व्हर स्क्रीन बॅनरखाली होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू हंट यांनी केले आहे. मात्र, पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर पडदा टाकण्यात आलेला नाही. नागा चैतन्यनं ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होते, तरीही त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.Source link

Leave a Reply