CSK | चेन्नईला ‘जोर का झटका’, हा मोठा खेळाडू स्पर्धेतून बाहेर


मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र चेन्नईला आयपीएलच्या 14 व्या मोसमापासून आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नई आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) अपयशी ठरली. मोसमाच्या सुरुवातीला स्टार बॉलर दीपक चाहरला दुखापतीमुळे मुकावं लागलं. (csk ipl 2022 chennai super kings all rounder ravindra jadeja ruled out due to injurey)

इतकं सार होऊनही चेन्नईच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही थांबायचं नाव घेत नाहीये. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे 15 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. चेन्नईने फ्रँचायजीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

जाडेजाला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंगदरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती, की त्याला दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्यालाही मुकावं लागलं होतं. जाडेजाला दुखापत झाल्यापासून त्याच्यावर वैदयकीय पथक लक्ष देऊन होतं. मात्र अखेर जाडेजाला दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकावं लागलंय.

जाडेजाने या मोसमाच्या सुरुवातीपासून चेन्नईचं नेतृत्व केलं. जाडेजाने पहिल्या 8 सामन्यात चेन्नईचं नेतृत्व केलं. या 8 पैकी 6 सामन्यात चेन्नईच्या पदरी पराभव आला. तर 2 सामन्यात विजय मिळवता आला. 

नेतृत्वात आलेल्या अपयशामुळे जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पुन्हा जबाबदारी स्वीकारली. दरम्यान चेन्नईचा पुढील सामना हा उद्या (12 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध पार पडणार आहे.Source link

Leave a Reply