Headlines

क्रिकेटला ब्रेक देत Virat Kohli पत्नीसोबत करतोय ‘हे’ काम, फोटो आले समोर

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. अनेक सामन्यात युवा खेळाडूंना डावलून विराटला संधी देऊन सुद्धा त्याचा फॉर्म परतला नाहीये. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंकडून त्याच्यावर चौफेर टीका होतेय. या सततच्या टीकेला त्रस्त झालेल्या विराटने आता मोठा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.  

सतत टीकेचा धनी ठरलेला विराट (Virat kohli) आता आध्यात्माकडे वळला आहे. अपय़शातून आता देवचं मार्ग काढेल अशी मानसिकता झाल्याने विराटने आता देवाचं दार गाठलं आहे. पत्नी अनुष्कासोबत (anushka sharma) कोहली देवाच्या भक्तीत लीन झाला आहे. या संबंधित फोटो आता समोर आले आहेत. 

भजन-कीर्तनाचा लुटला आनंद
प्रसिद्ध अमेरिकन गायक कृष्णा दास यांनी लंडनमध्ये भजन-कीर्तनाचे आयोजन केले होते. लंडनमध्ये ते भक्तिगीतांसाठी ओळखले जातात. याच त्यांच्या कीर्तनाला कोहली आणि अनुष्काने हजेरी लावली होती. कृष्णा दास यांच्या शिष्यांपैकी एक असलेल्या हनुमान दासने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कोहली आणि अनुष्कासोबत दिसत आहे.

दरम्यान हनुमान दास यांच्या या पोस्टवरून कोहली पत्नी अनुष्कासोबत भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. लंडनमधील युनियन चॅपलमध्ये हा कार्यक्रम झाला. हे भजन-कीर्तन 14 आणि 15 जुलै असे दोन दिवस चालले.

खराब फॉर्मं
विराट कोहलीचा सध्या वाईट काळ सुरु आहे. गेली अडीच वर्षे त्याला शतकही ठोकता आले नाहीए. कोहलीचा हा खराब फॉर्म इंग्लंडमध्येही त्याचा पाठलाग सोडत नाहीये. तसेच तो पाच महिन्यांपासून अर्धशतक करू शकला नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. त्याने 136 धावांची खेळी खेळली. तेव्हापासून विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) शतक झळकावता आलेले नाही.

दरम्यान कोहलीचा हा खराब फॉर्म आणखीण किती दिवस असेल हे सांगण अवघड आहे. मात्र त्याचा हा आऊट ऑफ फॉर्म टीम इंडियाला खुपच अडचणीचा ठरत आहे.  

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *