Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स


नवी दिल्ली: Old Cooler Makeover: सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे. काही शहरांचे तापमान ४३-४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या उन्हापासून सुटका व्हावी याकरिता प्रत्येक जण Coolers, AC सारखे कुलिंग डिव्हाइसेस खरेदी करतांना दिसून येत आहे. तुमच्याही शहरातीलत तापमान वाढले असेल. पण, नवीन कूलर खरेदी करण्याचा तुमचा प्लान नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, येथे आम्ही तुम्हाला जुन्या कुलरचा मेकओव्हर करण्याच्या काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे जुनाच कूलर तुम्हाला एसीसारखा थंड वारा देईल. महत्वाचे म्हणजे, नवीन कुलर खरेदी करायचा तर, त्याची किंमत किमान ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असते आणि जर तो खराब झाला तर तुम्हाला त्याच्या देखभालीचा खर्च देखील करावा लागतो. अशात, तुम्ही घरी असलेला जुना कूलर फेकून न देता कमी खर्चात अगदी नवीन सारखा बनवू शकता. यासाठी काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्याबद्दल जाणून घेऊया.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या:

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या. यामुळे कूलरची बॉडी मजबूत होईल. तसेच, कूलरमधील अस्वच्छतेसोबत बॅक्टेरियाही निघून जातील. यासोबतच कूलरच्या पॅडचे ग्रास देखील बदला.

कूलरच्या फॅनची सर्व्हिसिंग करा:

कुलर सुरू करण्यापूर्वी त्याच्या फॅनची सर्व्हिसिंग करून घ्या. कारण, अनेक वेळा पंख्याची मोटार योग्य देखभाली अभावी जॅम होते. जर तुम्ही जॅम झालेल्या मोटारला विजेने चालवण्याचा प्रयत्न केला तर, ती खराब होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे कुलर साफ केल्यानंतर पंख्याची सर्व्हिसिंग करून घ्या.

सबमर्सिबल पंप तपासा:

कूलरच्या टाकीमध्ये जर लिकेज असेल तर, तिथे M-सील लावा. त्यामुळे कुलरच्या टाकीतून बाहेर पडणारे पाणी थांबेल. यासोबतच कुलरला पाणीपुरवठा करणारा सबमर्सिबल पंप तपासा. जर सबमर्सिबल पंप नीट काम करत नसेल तर, बाजारातून नवीन सबमर्सिबल पंप खरेदी करून कूलरमध्ये बसवा. या सर्व कामानंतर तुमच्या रद्दीत पडलेला कुलर नवीन तर असेलच पण, AC सारखा थंड वारा देखील तुम्हाला मिळेल.

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

वाचा: WhatsApp Features: एकच नंबर ! आता ३२ जण करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग, येतंय नवीन फीचर

वाचा: Call Recording : Android मध्ये कॉल रेकॉर्डिंग बंद झाले असले तरीही ‘या’ पद्धतीने करता येतील कॉल रेकॉर्ड, पाहा डिटेल्स

Source link

Leave a Reply