काँग्रेसचा ज्येष्ठ नेता उमरान मलिकचा जबरदस्त फॅन, BCCI कडे ‘ही’ मागणी


मुंबई : 152 kmph वेगानं बॉलिंग करून फलंदाजांना घाम फोडणाऱ्या खेळाडूनं यंदाच्या हंगामात कहर केला. गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या खतरनाक बॉलिंगवर सगळे फिदा आहेत. त्याला टीम इंडियात घेण्याची मागणीही अनेक दिग्गजांनी केली आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम उमरान मलिकचे फॅन झाले आहेत. त्यांनी खास ट्वीट करून उमरानं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी BCCI कडे उमरानसाठी खास मागणी केली आहे. 

पी चिदंबरम यांनी उमरान मलिकचं कौतुक केलं आहे. उमरान त्याच्या रस्त्यात येणाऱ्यांना उडवतो आहे. त्याच्या वेगवान गती आणि आक्रमकतेचं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. बीसीसीआयने त्याच्यासाठी एक खास कोच द्यावा अशी मागणी केली आहे. 

उमरानसाठी एक खास कोच देऊन त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी बीसीसीआयला पी चिदंबरम यांनी केली आहे. उमराननं चार फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं. गुजरात विरुद्धच्या सामन्यात उमराननं 5 विकेट्स घेतल्या आहेत. 

ऋद्धीमान साहा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर आणि हार्दिक पांड्याची विकेट घेतली. आयपीएलच्या एकूण 8 सामन्यात उमरानने 15 विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या विकेट्सचं सेलिब्रेशन गुरु डेल स्टेनसारखं करताना उमरान दिसला. त्याच्या कामगिरीचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. Source link

Leave a Reply