प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते मुनीवर सुलताने यांना कॉंग्रेस सेवा दलाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

विटा -:- सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सूलताने यांना‌ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि.१४ नोव्हेंबर ( बालदिन) रोजी भावे नाट्यगृह येथे सांगली कॉंग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन) व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (सहकार दिन) यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, आर्थिक, पत्रकारिता, साहित्य,क्रिडा, शैक्षणिक विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सेवादल पूरस्कार २०२१ प्रदान करण्यात येणार आहे.

यापैकी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री.मुनीवर सुलताने यांचा सांगली जिल्ह्यातील विविध पुरोगामी, व्यवस्था परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,विद्रोही सांस्कृतिक परिषद, भटकेविमुक्त विकास फोरम , मुस्लीम सत्यशोधक मंडळ या संघटनेचे ते सदस्य आहेत. विटा येथील अग्रणी सोशल फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी खानापूर व आटपाडी तालुक्यातील भटकेविमुक्त जमाती , एकल महिला व दिव्यांग समूहाच्या सक्षमीकरणासाठी बहुमोल योगदान दिले आहे.श्री.सुलताने हे खानापूर तालुका विधी सेवा समितीचे विधीसेवक ,सांगली जिल्हा माहिती अधिकार संघटनेचे स्वयंसेवक तर एम. एस. डब्ल्यू .पदवीधर संघटनेचे तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.वरील सर्व सामाजिककार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, राज्यमंत्री ना.विश्वजीत कदम,मा. केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.विक्रम सावंत,जेष्ठ नेते आ.मोहनशेठ कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील तसेच कॉंग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. श्री.सूलताने समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने मुनीवर सूलताने यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply