Headlines

congress sachin sawant tweet objects hindutva bjp party constitution eknath shinde devendra fadnavis

[ad_1]

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंसोबत असणारे इतरही काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवसेना भवनातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून जोरदार मोहीम आगामी काळात उघडली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नव्या सरकारसंदर्भात आक्षेप घेण्यात आला असून त्यासाठी भाजपाने त्यांच्या पक्षाची घटना तपासावी, त्यात बदल करावा, असं आव्हान देखील काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं बंडखोर आमदार आणि भाजपाकडून देखील सांगितलं जात आहे. हिंदुत्वावर आधारीत विचारसरणी आणि त्याला अनुसरून सरकार स्थापन केल्याचे दावे केले जात असताना काँग्रेसनं त्यावर आक्षेप नोंदवला आहे. भाजपाच्या घटनेमध्येच ‘हिंदुत्व’ हा शब्द नसल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“आधी त्यांनी पक्षघटना बदलून दाखवावी”

आशिष मेटे नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून भाजपाच्या फॉर्म ए चा फोटो असल्याचं नमूद करत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये “मी धर्मनिरपेक्ष राज्य आणि कोणत्याही धर्मावर आधारीत नसणारं राष्ट्र या संकल्पनांचा स्वीकार करतो”, असा उल्लेख अर्जदारांसाठी असणाऱ्या प्रतिज्ञेमध्ये करण्यात आला आहे. हे ट्वीट रीट्वीट करत सचिन सावंत यांनी त्यावरून भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

“मी काय लोटांगण घालणार आहे का? त्यांच्या…”, संजय राऊतांचा दावा संदीपान भुमरेंनी फेटाळला, दिलं जाहीर आव्हान!

“भाजपा हा अत्यंत दांभिक आणि दुतोंडी पक्ष आहे. त्यांच्या पक्ष घटनेमध्ये ‘हिंदुत्व’ हा शब्दही नाही. आधी त्यांनी पक्षघटना बदलून दाखवावी”, असं आव्हान सचिन सावंत यांनी केलं आहे.

शिवसेना-भाजपाच्या पक्षघटनेचे फोटो!

दरम्यान, या ट्वीटसोबतच दुसऱ्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी भाजपाच्या पक्षघटनेचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासंदर्भात असणारे उल्लेख दर्शवून त्यावरून सावंत यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आक्षेप घेतला आहे. “..आणि ते म्हणतात की एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं हे ईडी सरकार हिंदुत्वासाठी स्थापन केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्यांच्या स्वत:च्या पक्षाची घटना पाहण्याची तसदी ते घेतील का?” असा सवाल सचिन सावंत यांनी ट्वीटमधून केला आहे.

‘हा पक्ष राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीवादी समाजवाद, सकारात्मक धर्मनिरपेक्षता अर्थात सर्वधर्मसमभाव आणि मूल्यांवर आधारीत राजकारणाशी बांधील आहे’, असा उल्लेख भाजपाच्या घटनेत असल्याचं या फोटोंमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, यातल्या दुसऱ्या फोटोमध्ये शिवसेनेच्या घटनेचे फोटो सचिन सावंत यांनी शेअर केले आहेत. त्यामध्ये, ‘पक्ष राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मता या तत्वांना बांधील असेल’, असं नमूद असल्याचं दिसून येत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *