Headlines

congress sachin sawant mocks bjp sushma andhare mimicry bhaskar jadhav

[ad_1]

राज्यात सध्या नेत्यांच्या नकला आणि त्यावरून दाखल झालेले गुन्हे यावरून जोरदार चर्चा होत आहे. दसऱ्यानंतर काही दिवसांनी ठाण्यात पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये काही नेतेमंडळींनी केलेल्या नकला चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामध्ये भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. तसेच, राष्ट्रपतींचं नाव घेत उपहासात्मक भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच सुषमा अंधारे यांनीही केलेल्या नकला चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं असतानाच आता काँग्रेसकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करून भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

सुषमा अंधारेंची टोलेबाजी!

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुन्हे दाखल करण्याच्या कृतीवर सडकून टीका करताना थेट राज ठाकरेंचा संदर्भ दिला. राज ठाकरे आणि माझ्यासाठी वेगळे नियम का? असा सवालच त्यांनी उपस्थित केला. “राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या तुम्ही विचारलं पाहिजे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“आमचे चुलत भाऊ राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला टोला

“भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर…”

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपावर खोचक टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ शेअर करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. ‘भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे नीट अध्ययन केले असते तर शिवसेनेच्या भास्कर जाधव व इतर नेत्यांवर नकला केल्या म्हणून गुन्हे दाखल झाले नसते.नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे”, असं सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

सचिन सावंत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणातील दोन व्हिडीओ क्लिप एकत्र केल्या आहेत. या दोन्ही व्हिडीओ क्लिपमध्ये मोदी राहुल गांधींची नक्कल करताना दिसत आहेत. पहिल्या क्लिपमध्ये मोदींनी राहुल गांधींची हाताच्या बाह्या वर सरकवण्याची नक्कल केली आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये संसदेत भाषणादरम्यान राहुल गांधींची डोळा मारण्याची नक्कल मोदी करताना दिसत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *