Headlines

Congress high command should take strict action against the 7 MLAs who were involved in cross-voting in the

[ad_1]

Congress Issues Notice MLAs विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात क्रॉस वोटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी याबाबत माहिती दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या विरोधात सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते.

हेही वाचा- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांना डोहाळे

विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार सभागृहात उशीरा पोहोचले त्यामुळे त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही- नितीन गडकरी

पक्षाकडून गैहजर आमदारांना नोटीस

मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते. दरम्यान, ‘गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला टोला लगावला होता. या संदर्भातही पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *