कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! एक-दोन नव्हे तर 3-3 अर्शदीप सिंह उतरले मैदानात?


त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असेल, पण या मॅचने बरीच चर्चा केली. खेळाडूंचं सामान न मिळाल्याने सामना तीन तास उशिराने सुरू झाला होता. त्यानंतर सामन्यातील एक दृश्य असं घडलं की, फॅन्सही थक्क झाले होते. कारण मैदानावर तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती.

सूर्यकुमार यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग स्वतः अर्शदीप सिंगच्या नावाची जर्सी घालून मैदानावर खेळत असताना हा प्रकार घडला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली, जेव्हा सूर्यकुमार यादव ओपनिंगला रोहित शर्मासोबत आला तेव्हा त्याने अर्शदीप सिंगचीच जर्सी घातली होती.

याशिवाय टीम इंडियाच्या गोलंदाजीची वेळ आली तेव्हा आवेश खानही अर्शदीप सिंगची जर्सी घालून खेळत होता. यानंतर स्वतः अर्शदीप सिंगने त्याची जर्सी घातली होती. मैदानावर अर्शदीपच्या नावाच्या तीन जर्सी एकत्र पाहिल्यानंतर चाहतेही गोंधळले.

या संबंधित अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलंय, आधी मला वाटलं की, अर्शदीप सिंह का ओपनिंगला आला, मग पाहिलं की, तो सूर्यकुमार यादव आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी खेळाडूंच्या सामानाबाबत बराच गोंधळ झाला होता. सेंट किंट्समध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंचं सामान आलं नव्हतं, त्यामुळे सामना सुरु होण्यात उशीर झाला. अशा परिस्थितीत जर्सी नसल्यामुळे खेळाडूंनी असं केलं असल्याचा अंदाज आहे.Source link

Leave a Reply