Headlines

शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या- रेखा चिकणे

बार्शी /प्रतिंनिधी – शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या.अशी मागणी रेखा चिकणे , भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे  , प्रवीण तुकाराम डोके  यांनी तहसिलदार सुनील शेरखाने यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की शेतकरी यांनी कर्ज काढून शेतात खर्च केला आहे . आता सणासुदीचे दिवस आले आहेत. हातातोंडाला आलेला घास अतिवृष्टी मुळे पाणयात वाहून गेला. शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या , ओला दुषकाळ जाहिर करून सर्व शेतकरयांना हेक्टरी पन्नास हजार रूपये मदत त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .नाहीतर शेतकरी आक्रमक होतील व पुढील होणार परिणामास शासन जबाबदार असेल.

 महाराष्ट्र शासनाने अकस्मीक निधीतून शेतकरी यांना तातडीने खातयावर पैसे जमा करावे हि विनंती केली . निवेदनावरती  सूर्यकांत गोविंद चिकणे व प्रवीण तुकाराम डोके ,रेखा सूर्यकांत चिकणे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *