Headlines

cm eknath shinde busy in farming during his two day stay in village at satara zws 70

[ad_1]

वाई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या साताऱ्यातील आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या मुक्कामात शेतीत रमले.शेतीतील उभ्या पिकात शिवारफेरी करत मशागत केली. आज स्ट्रॉबेरीची लागवड केली.आपल्या शेतीत व गावात फेरफटका मारला.ग्रामस्थांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दरे (ता महाबळेश्वर)मुक्कामी आहेत.मुख्यमंत्री झाल्यानंतर ते यापूर्वी गावी आले होते पण त्यांना मुसळधार पावसामुळे ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेता आले नव्हते.त्यामुळे गावी आल्याआल्या त्यांनी प्रथम आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले.आज गावात आणि शेतात फेरफटका मारला.त्यांनी शेतात चंदन त्यात गवती चहा,हळद ,हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केली आहे.आज स्ट्रॉबेरीची लागवड केली.हळदी तील गवत कोळपुन काढलं. शेतात मांडी घालून मातीत बसून स्ट्रॉबेरीची लागवड केली.

मुख्यमंत्री साताऱ्यांतील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी करुन स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. तसंच यंत्राद्वारे शेतातील पिकाची मशागतही केली. गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं उत्साहात स्वागत केल.

शेतातील कामे आटोपुन मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. तसंच त्यांच्या शेतात असलेल्या गवती चहाच्या पिकासह आंब्याच्या बागेची पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी सकाळी दरे या गावात पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. साताऱ्यात कोयना धरणासह,मराठवाडी,कण्हेर आदी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.तोअनेक गावच्या ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा आहे. या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या उतेश्वर देवाचं दर्शन मुसळधार पावसामुळं झाले नव्हते. मात्र आता या भागात पाऊस थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ग्रामदैवताचं दर्शनही घेतलं आहे.पिकांची पाहणी करत माध्यमांच्या प्रतिनिधींना शेताची शिवार फेरी घडविली आणि त्या त्या पिकांबद्दल माहिती दिली. गावचा सुपुत्र मुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण गाव उत्साहात होते.आज मुख्यमंत्र्यांच्या गावच्या परिसरात मस्त गुलाबी थंडी,पूर्ण सूर्य प्रकाश असल्याने रोजच्या दगदगीतून गावी आल्यामुळे मुख्यमंत्री आनंदी आणि उत्साही दिसत होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *