शहर स्वच्छतेत सफाई कामगारांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा): कुठल्याही शहरात साफसफाईचे काम हे अतिशय महत्त्वाचे असून सफाई कामगारांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून कुठल्याही शहरातील नागरिकांनी सफाई कामगारांचे उपकार विसरता कामा नये असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला नगरपालिकेत स्वच्छ भारत मिशन – स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हॅडकार्टचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले,  पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,  विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शहरात अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठलही शहर हे अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज असून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जेवढी सफाई कामगारांची आहे तितकीच जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे. कोरोनाच्या अतिशय कठीण काळातही स्वच्छतेचे काम सफाई कामगारांनी केले. त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून ते खरे योद्धा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Source link

Leave a Reply