सिनेमांवरील बॉयकोटच्या ट्रेण्डवर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाला?


Akshay Kumar on Boycott Trend: ‘रक्षा बंधन’च्या मुहूर्तावर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, एक आमीर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि दुसरा म्हणजे अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट. या दोन चित्रपटांच्या क्लॅशमुळे कुठला चित्रपट कुठल्या चित्रपटावर भारी पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 

तेव्हा अशावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे भविष्य काय असेल याबद्दलही अनेकांना शंका होती. या दोघांमध्येही मोठी स्पर्धा रंगणार का असा प्रवाह सगळीकडे पसरला होता. काही समीक्षकांनी असेही सांगितले होते की कदाचित या दोन चित्रपटांच्या कलेक्शनवर परिणामही होऊ शकतो. 

परंतु सध्या सगळीकडेच बॉयकोटचा ट्रेण्ड पसरू लागला आहे. सोशल मीडियावर तर लोकांनी अक्षरक्षः आमीर आणि अक्षयच्या चित्रपटाला झोडपून काढले आहे. गेल्या दिवसांपासून #boycottrakshabandhan #boycottlaalsinghchaddha हे ट्रेण्ड्स फिरू लागले होते. परंतु आता चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी अक्षय कुमारने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहे. 

‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार म्हणाला, “माझा या बॉयकोट ट्रेण्डवर विश्वास नाही. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी कारण दोन्ही चित्रपट चांगले चालले पाहिजेत आणि त्यासाठी आमचा एकमेकांनी आधार असेल. आमचे दोन्ही चित्रपट चांगले चालले पाहिजेत. सलग 3-4 दिवस सुट्ट्या आहेत. सध्या चित्रपट चालणे ही इंडस्ट्रीची गरज आहे. 

एका मुलाखतीदरम्यान आमिर खानने अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’बद्दल सांगितले होते की, “मी ट्रेलर पाहिला आहे आणि चित्रपटाची कथा फारच सुंदर आहे.” परंतु आमीरच्या या वाक्यावरूनही ट्रोलर्सनी आमीरवर टीका केली होती, आमीर अक्षय कुमारच्या चित्रपटाला घाबरत असल्याचे त्याने म्हटले होते. 

कॉफी विथ करणमध्ये आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यादरम्यान चित्रपट निर्माता करण जोहरने अक्षयच्या तीन चित्रपटांची नावे विचारली असता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट या साध्या प्रश्नाचे उत्तरही देऊ शकला नाही. यानंतर अक्षय आणि आमिर खान यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या.Source link

Leave a Reply