चूकीला माफी नाही! एक चूक आणि कॅप्टन पंतकडून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट


मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (10 एप्रिल) डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना हा कोलकाता विरुद्ध दिल्ली (KKR vs DC) यांच्यात खेळवण्यात येत आहे. केकेआरने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. केकेआर टीममध्ये एकही बदलाव करण्यात आला नाही. मात्र ऋषभ पंतने (Rishabh Pant) दिल्ली टीममध्ये एक मोठा बदल केला आहे. कॅप्टन ऋषभने एनरिच नॉर्खियाच्या (anrich nortje) जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खलील अहमदला संधी दिली. दुखापतीतून सावरल्यानंतर नॉर्खियाला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात नॉर्खिया खेळला होता. मात्र पंतने एकाच सामन्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. (ipl 2022 kkr vs dc delhi capitals captain rishabh pant anrich nortje replaced to khaleel ahmed in playing eleven against kolkata)

नॉर्खियाला लखनऊ विरुद्ध विशेष अशी कामगिरी करता आली नाही. त्याने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजी केली. मात्र त्याला अचूक आणि विकेट मिळेल अशी बॉलिंग करता आली नाही. तसेच नॉर्खियाने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 2 बीमर बॉल टाकले. 

बॉलरने क्रीझमध्ये असलेल्या बॅट्समनच्या कंबरेवर टाकलेल्या फुलटॉस बॉलला बीमर म्हटलं जातं. नॉर्खियाने टाकलेल्या या 2 बीमरमुळे अंपायरने बंदी घातली. पंतने कदाचित या कारणामुळेच नॉर्खियाला कोलकाता विरुद्धच्या या सामन्यातून वगळलं असावं, असं म्हटलं जात आहे. दिल्लीने नॉर्खियाला या 15 व्या मोसमासाठी रिटेन केलं होतं. नॉर्खियासाठी दिल्लीने 6 कोटी 50 लाख रुपये मोजले होते.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वार्नर, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद. 

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन  | श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती. Source link

Leave a Reply