Headlines

मुख्यमंत्री शिंदेंचा ‘दाढी’ असा उल्लेख करत चंद्रकांत खैरेंची टीका; जाहीर सभेतील भाषणात म्हणाले, “त्यांनी या दाढीला पकडलं आणि…” | chandrakant khaire slams cm eknath shinde says bjp rebel shivsena mla came together for own good scsg 91

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार आणि नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषणादरम्यान खैरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने भाजपाने ‘दाढी’ला सोबत घेऊन सरकार पाडल्याची टीका केलीय.

नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार?

चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच येथे जमलेले सर्वजण हे ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असं सांगितलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराची आहे. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे),” असं खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. पुढे बोलताना, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असं ते म्हणाले.

नक्की वाचा >> “शाहांसोबतच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं पण उद्धव ठाकरेंनी…”; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल माजी आमदाराचा खुलासा

खैरे यांनी आपल्या भाषणामधून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. भाजपा आणि शिंदे गट स्वार्थासाठी एकत्र आल्याचा आरोप खैरे यांनी केला. “स्वार्थासाठी ही मंडळी एकत्र आली. आता पडेल, मग पडेल असं ते म्हणत होते. पण सरकार पडत नव्हतं. मग त्यांनी या दाढीला पकडलं आणि सुरुवात झाली. दाढीला समजतं नाही,” अशा शब्दांमध्ये खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. “त्यांनी एक चित्रपट काढला आनंद दिघेंवर. त्यात एक संवाद आहे, गद्दाराला माफी नाही, क्षमा नाही. मग आता आम्ही काय केलं पाहिजे?,” असा टोलाही खैरेंनी लगावला.

नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

“आपण (उद्धव ठाकरे समर्थक) सध्या काहीच करत नाही. मला पत्रकार म्हणाले, पाच जण गेले आपण काहीच केलं नाही. पण आपण २७ तारखेपर्यंत शांत रहायचं. २७ तारखेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. आपण जोरदार पद्धतीने तो साजरा करु. पण त्याच्यानंतर मात्र आपलं काम सुरु करायचं,” असा सूचक इशारा खैरेंनी विरोधकांना दिला. तसेच खैरे यांनी सभेतील गर्दीकडे पाहून, “हे उड्या मारतात ना त्यांना सांगा पाहा युवासेनेच्या कार्यक्रमाला किती गर्दी आहे,” असंही म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *