Headlines

“मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळी स्तुतीसुमनं | governor bhagat singh koshyari appreciate cm eknath shinde

[ad_1]

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवासाठी करोना प्रतिबंधक नियमांमध्ये पूर्ण शिथिलीकरण, असे काही निर्णय या काळात एकनाथ शिंदे यांनी घेतले. स्थानिक आमदारांनी तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही एकनाथ शिंदे हजेरी लावत आहेत. दरम्यान, अशाच एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसले. यावेळी कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. एकनाथ शिंदे कमी काळात लोकप्रिय झाले आहेत, असे कोश्यारी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> शिवसेनेने निमंत्रण दिल्यास राष्ट्रवादीचे नेते दसरा मेळाव्याला जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना अवघे काही दिवस झालेले आहेत. मात्र या काळात शिंदेंनी सर्वांवरच आपली छाप पाडली आहे, असे वाटतेय. एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. ‘टीव्ही ९ मराठी’ने तसे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यात वेळोवेळी संघर्ष पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोश्यारी यांनी यापूर्वी अनेकवेळी लक्ष्य केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी कोश्यारी यांनी साधारण अडीच वर्षं मंजूर केली नव्हती. या मुद्द्यावरूनही कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीका केली गेली. मात्र आता सत्तांतरानंतर राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे संयुक्त सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राज्यपालांनी ही मागणी मान्य करुन ती यादी मागे घेतली. त्यानंतरही कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *