‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार


मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच ऋषभ पंतनेच खुलासा करून असे काहीही नसल्याचे सांगितले. ऋषभनं एका मुलाखतीत सांगितलं की, लोक खोटं बोलतात आणि केवळ लोकप्रियतेसाठी त्याचं नाव वापरतात. ऋषभचं हे वक्तव्य उर्वशीला उद्देशून असल्याच्या चर्चा सुरु असताना. आता उर्वशीनेही नाव न घेता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे,  ज्यामध्ये तिने ऋषभला ‘छोटू भैया’ आणि ‘आरपी’ म्हटले आहे.

 

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्वशी या पोस्टमध्ये म्हणाली, ‘छोटू भैय्याने बॅट बॉल खेळायला पाहिजे. मी काही मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या लहानमुलासाठी बदनाम होईल. छोटू भैयाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शांत बसलेल्या मुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका.’ 

आणखी वाचा : ‘हर हर शंभू’ फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याच कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऋषभने केली उर्वशीबद्दल पोस्ट?
यापूर्वी, ऋषभनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर केली होती, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की त्यानं ती पोस्ट उर्वशीसाठी लिहिली आहे. यामध्ये त्यानं कोणाचेही नाव घेतले नाही. ऋषभने लिहिले की, ‘प्रसिद्धी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये कसं खोटं बोलतात हे विचित्र आहे. काही लोकांना नाव कमावण्याची आणि प्रसिद्ध होण्याची भूक असते हे पाहणं दुःखदायक आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. या पोस्टसोबतच्या हॅशटॅगमध्ये ऋषभने लिहिले की, ‘मेरा पीछा छोड़ो बहन और झूठ की भी लिमिट होती है’. मात्र, नंतर ऋषभनं ही पोस्ट डिलीट केली.

आणखी वाचा : अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

काय म्हणाली उर्वशी?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने दावा केला होता की, दिल्लीत तिच्या एका शूटिंगदरम्यान कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. तो म्हणाला, ‘मिस्टर आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीत आले आणि मला भेटायला थांबले. 10 तास त्यांनी मला फोन केले. मी मात्र इतकी थकले होते की मी गाढ झोपी गेले आणि मला त्यांचा फोन येऊन गेला लक्षातच आलं नाही. वगैरे वगैरे… खूप काही ती बोलली. पण, जेव्हा RP कोण? असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र मी नाव नाही सांगणार असंच तिनं स्पष्ट केलं. 

आणखी वाचा : सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

उर्वशीला ऋषभने ब्लॉक केले होते
अभिनेत्रीनं एका क्रिकेटरला डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत यांची नावं जोडली जाऊ लागली. मात्र, ऋषभनं अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आणि उर्वशीला सोशल मीडियावर ब्लॉकही केले.Source link

Leave a Reply