Network Signal: फोनमध्ये अशी चेक करा नेटवर्क स्ट्रेंथ, कॉल का ड्रॉप होतो हे सुद्धा होणार माहित


नवी दिल्ली: 3G 4G Network : कधी -कधी मोबाईलवर बोलत असताना कॉल कट झाला किंवा कॉलिंगमध्ये खूप अडचण आली तर युजर्स सहसा सर्व दोष नेटवर्क ऑपरेटर्सवर टाकतात. पण, ही समस्या हँडसेटमध्येही असू शकते. अनेकदा समस्या हँडसेटबाबत असते. फोनची नेटवर्क Network Strength Weak आहे आणि यामुळे कॉलिंग आणि डेटासह इतर अनेक समस्या यायला लागतात. हँडसेट खरेदीच्या वेळी, युजर्स फोनमधील फीचर्स , डिझाईन स्टाईल आणि किंमत पाहून सर्वोत्तम डिव्हाइस खरेदी करतात. परंतु, नेटवर्ककडे विशेष लक्ष देत नाही नाही . त्या वेळी ते तपासण्याचा कोणताही मार्ग नसला तरी, तुम्ही ते नंतर तपासू शकता.

वाचा: अधिक Virtual RAM ऑफर करणारा फोन चांगला की, जास्त Physical RAM देणारा, तुमच्यासाठी काय बेस्ट

नेटवर्क स्ट्रेंथ काय आहे?

मोबाईलमधील नेटवर्क स्ट्रेंथ तुमच्या फोनमध्ये कोणत्या प्रकारचे सिग्नल येत आहे हे सांगते. ते तुमच्या कॉलिंग आणि डेटासह इतर नेटवर्क आधारित सेवांच्या क्वालिटीवर अवलंबून असते. नेटवर्क स्ट्रेंथ dBm मध्ये मोजले जाते. dBm म्हणजे डेसिबल-मिलीवॅट्स. नेटवर्क स्ट्रेंथ प्रत्येक ३ dBm साठी दुप्पट होते. त्याच वेळी, प्रत्येक ६ dBm क्षेत्र दुप्पट व्यापते. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनमध्ये -८३ dBm नेटवर्क असेल आणि ते -८० वर गेले तर पॉवर दुप्पट होईल आणि जर ते -७७ dBm असेल तर त्याचे कव्हरेज क्षेत्र दुप्पट होईल. म्हणून लक्षात ठेवा की, नेटवर्क स्ट्रेंथ नेहमी dBm मध्ये असेल आणि ते जितके कमी असेल तितके चांगले.

वाचा: PVC Aadhar कार्डसाठी नाही रजिस्टर्ड मोबाईल नंबरची गरज, पाहा ‘ही’ प्रोसेस, सहज होईल काम

नेटवर्कची स्ट्रेंथ तपासण्याचा मार्ग:

Android फोनसाठी: Android फोनमध्ये नेटवर्क स्ट्रेंथ मोजण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी तुम्ही आधी तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा. तिथून तुम्हाला अबाउट फोन सिलेक्ट करून त्यावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील. परंतु, तुम्हाला स्टेटसवर जावे लागेल. येथेही अनेक पर्याय आहेत. परंतु, तुम्हाला Sim Card Status निवडावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर, एक नवीन विंडोज उघडेल आणि येथे तुम्हाला तळाशी सिग्नल स्ट्रेंथ दिसेल. सिग्नल स्ट्रेंथ किती आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. अनेक मोबाईल फोनमध्ये ही पद्धत थोडी वेगळी असू शकते. विशेषत: चायनीज ब्रँडच्या फोनमध्ये, तुम्हाला प्रथम फोनवर जावे लागेल. येथून तुम्हाला स्टेटस आणि नंतर नेटवर्कवर क्लिक करावे लागेल. यामुळे सिग्नलची स्ट्रेंथ समोर येईल.

वाचा: Recover Deleted Data: लॅपटॉप मधून डिलीट झालेला डेटा ‘असा’ करा रिकव्हर, पाहा डिटेल्स

Source link

Leave a Reply