Headlines

chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case spb 94

[ad_1]

भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेला गुन्हा खोटा असून राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या आरोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आव्हाडांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला आव्हाडांनी ‘बहीण’ म्हटलं? राष्ट्रवादीने थेट VIDEO च दाखवला

काय म्हणाले बावनकुळे?

“जितेंद्र आव्हाडांना जाणीवपूर्वक लक्ष केल्या जात असल्याचा आणि राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप चुकीचा आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. अशा प्रकारे जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणे योग्य नाही. जे त्यांचे समर्थन करत आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप

दरम्यान, ७२ तासांत दोन गुन्हे दाखल झाल्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “आव्हाडांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. केवळ कोणाच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झालेले नाही. त्यामुळे आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील नाही, हे राष्ट्रवादीने लक्षात घ्यावे. तसेच जितेंद्र आव्हाडांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विनयभंगाच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटला; म्हणाले, “माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं, तरी चाललं असतं पण…”

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली होती. “राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर खोटे आरोप केल्या जात आहे. अशा आरोपांमुळे कुटुंब उद्धवस्त होतात. आज आमच्यावर ही वेळ आली आहे, उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते. यासाठी राज्यात ईडी सरकार अस्थित्त्वात आले का? एकतर कोणाला प्रलोभनं द्या किंवा दपडशाही करा, एवढंच काम सध्या ईडी सरकार करते आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *