Headlines

chandrashekhar bawankule replied to sanjay raut mid term elections predictions spb 94

[ad_1]

महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर झालं असून मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिली होती. दरम्यान, संजय राऊतांच्या या विधानावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – “शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप

शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी आज सकाळी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं होते. यावेळी बोलताना त्यांनी “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं असून मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे”, अशी प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा – “त्यांच्या…”, विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी लढणारी स्त्री”

दरम्यान, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, ठाकरे गटात राहिलेले आमदार टीकवण्यासाठीच मध्यावधी निवडणुकीची भाषा केली जात असल्याचा खोचक टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. “उद्धव ठाकरेंच्या गटातील सर्वच नेते अशा प्रकारे भाषा बोलत असून निवडणुकीनंतर आमच्या १६४ आमदारांची संख्या १८४ वर जाईन, त्यामुळे त्यांनी नको त्या गोष्टीत लक्ष घालू नये. त्यांना विरोधी पक्षाचे काम मिळाले आहे, ते त्यांनी पार पाडावे”, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *